स्व. गोपाळराव मोरे यांच्या स्मारकासाठी भरघोस निधी देणार

पालकमंत्री भुजबळ यांचे आ. बोरसेंना आश्वासन
स्व. गोपाळराव मोरे यांच्या स्मारकासाठी भरघोस निधी देणार

मुंजवाड । वार्ताहर Munjwad- Baglan

आमदार निधी (MLA fund) सोबतच जिल्हा नियोजनमधून निधी (Funding from district planning) कमी न पडू देता केळझर गोपाळ सागर धरणाचे शिल्पकार स्व. गोपाळराव मोरे (Gopalrao More) यांच्या प्रेरणा स्थळाचा विकास केला जाईल, असे आश्वासन (Assurance) जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी दिले आहे.

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) सुमारे चाळीस गावांना पाणी पुरविणार्‍या केळझर धरणाचे (Kelzhar Dam) शिल्पकार व चौधाण्याचे भूमिपुत्र स्व. गोपाळराव मोरे यांच्या स्मुर्तीना उजाळा देण्यासाठी आ. दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांनी गेल्या वर्षभरापूर्वी धरण परिसरात स्मारक उभारण्याची घोषणा करून त्या कामासाठी 11 लाख रुपयांचा निधीही जाहीर केला आहे.

या स्मारकाचा चौफेर विकास व्हावा या मागणीसाठी आ. दिलीप बोरसे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन साकडे घातले. स्मारकाच्या विकासासंदर्भात असलेल्या संकल्पनेकडे आ. बोरसे यांनी पालकमंत्री भुजबळ यांचे लक्ष वेधले. स्व. मोरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्व. मोरे यांनी बागलाणच्या दुष्काळग्रस्त गावांना संजीवनी मिळवून देण्यासाठी पायपीट करून केळझर धरण निर्मितीचा संकल्प केला.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (late Prime Minister Indira Gandhi) यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत केळझर धरणाची निर्मिती केली. त्यामुळे केळझर धरणाचे शिल्पकार स्व.गोपाळराव मोरे हे खर्‍या अर्थाने जलदूत असून त्यांचे कार्य संपूर्ण राज्याला प्रेरणा देणारे आहे. अशा महान व्यक्तीच्या स्मृर्तीना उजाळा देण्यासाठी आमदार निधी सोबतच जिल्हा नियोजनमधून या स्मारकाचा चौफेर विकास केला जाईल, असे आश्वासन देऊन याबाबत जिल्हाधिकारी यांना तात्काळ सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी केल्या.

Related Stories

No stories found.