मागील ५८० वर्षांमधले सर्वात दीर्घ खंडग्रास चंद्रग्रहण उद्या; वाचा सविस्तर

मागील ५८० वर्षांमधले सर्वात दीर्घ खंडग्रास चंद्रग्रहण उद्या; वाचा सविस्तर

नाशिक |सुजाता बाबर Nashik

गेल्या ५८० वर्षांमध्ये इतके दीर्घकाळ दिसणारे चंद्रग्रहण झाले नव्हते असे चंद्रग्रहण उद्या (दि १९) रोजी दिसणार आहे! हे ग्रहण तब्बल ३ तास आणि २८ मिनिटे दिसणार आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी कार्तिक पौर्णिमा आणि खंडग्रास चंद्रग्रहण आहे. या पूर्वीचे साधारण इतकेच दीर्घ चंद्रग्रहण १८ फेब्रुवारी १४४० रोजी दिसलेले होते. सामान्यतः इतके दीर्घकाळ दिसणारे ग्रहण ही हजार वर्षातून एकदाच दिसणारी घटना आहे. (last 580 years big Khandgras lunar eclipse on Friday)

मागील ५८० वर्षांमधले सर्वात दीर्घ खंडग्रास चंद्रग्रहण उद्या; वाचा सविस्तर
सर्वात लांब चंद्रग्रहण पाहा फोटोंमधून

भारतातील अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि आसाममधील (Assam) काही भागांमधून ही दुर्मिळ घटना दिसेल. मात्र अशा दुर्मिळ घटनेचा लाभ नाशिककरांना होणार नाही. नाशिकमधून हे ग्रहण दिसणार नाही. हे चंद्रग्रहण अमेरिका (America), उत्तर युरोप (north europe), पूर्व आशिया (East Asia), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि पॅसिफिकमधून दिसेल. साधारण इतक्याच दीर्घकाळ चालणारे चंद्रग्रहण पुन्हा ८ फेब्रुवारी २६६९ रोजी दिसणार आहे!

हे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी सुरु होईल आणि ४ वाजून १७ मिनिटांनी संपेल. दुपार असल्याने स्पष्ट दिसणार नाही, तर हलकीशी अस्पष्ट चंद्रकोर दिसेल. चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून न जाता विरळ छायेतून जाणार असल्याने तो थोडासा अंधुक झालेला दिसेल. म्हणूनच हे ग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण ठरते.

पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी असते. तसेच सूर्य-पृथ्वी-चंद्र यांच्यातील कोनीय अंतर हे १८० अंश असते, म्हणजेच ते प्रतीयुतीमध्ये असतात. ज्या पौर्णिमेला चंद्र, पृथ्वी आणि सूर्य अनुक्रमे एका रेषेत येतात तेव्हा आपल्याला चंद्रग्रहण दिसायला हवे. परंतु प्रत्येक पौर्णिमेला मात्र चंद्रग्रहण दिसत नाही. याचे कारण म्हणजे जरी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आले तरी दरवेळी एका प्रतलात येत नाहीत. याचमुळे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आले तर त्या विशेष पौर्णिमेला चंद्रग्रहण होते.

मागील ५८० वर्षांमधले सर्वात दीर्घ खंडग्रास चंद्रग्रहण उद्या; वाचा सविस्तर
सर्वात लांब चंद्रग्रहण पाहा फोटोंमधून

सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावल्या पडतात. प्रछाया (गडद छाया, Umbra) व उपछाया (विरळ छाया, Penumbra). प्रछाया ही सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. चंद्रग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीच्या ज्या छायेमध्ये दिसतो त्यावरून चंद्रग्रहणाचे प्रकार असतात.

या दोन्ही सावलींची व्याप्ती चंद्रबिंबाच्या व्याप्तीपेक्षा मोठी आहे. त्यामुळे संपूर्ण चंद्रबिंब कोणत्याही सावलीत सापडू शकते. चंद्राचे भ्रमणकक्षेचे प्रतल आणि आयनिक वृत्त म्हणजे सूर्याचा भासमान मार्ग यांच्या प्रतलांमध्ये ५०९’ एवढा कोन आहे. ही दोन्ही प्रतले एकमेकांना दोन ठिकाणी छेदतात, या दोन बिंदूंना पात असे म्हणतात व आपण त्यांना राहू व केतू असेही म्हणतो. चंद्राचा काही भाग जर विरळ छायेत असेल आणि काही भाग जर गडद छायेत असेल तर खंडग्रास चंद्रग्रहण दिसते.

ग्रहणे ही एक वैज्ञानिक आणि खगोलीय घटना आहे. अनिष्ट परिणाम किंवा संकटे यांच्याशी याचा काहीही संबंध नाही. निसर्गाचा एक भाग आहे आणि यामुळे सर्वांनी याचा आनंद घ्यावा.

(सुजाता बाबर, खगोल अभ्यासक, नाशिक)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com