लासलगावला महिलेवर खंडणीचा गुन्हा

जामनेर नगर अध्यक्षांवर केला होता विनयभंगाचा गुन्हा
लासलगावला महिलेवर खंडणीचा गुन्हा

नाशिक। Nashik

जळगाव जिल्ह्यातील जामनेर चे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी पुतण्याबरोबर लग्न लावून दिलेल्या अल्पवयीन मुलीने विनयभंगाची फिर्याद दाखल केली होती. ही फिर्याद मागे घेण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी घेताना अल्पवयीन मुलीच्या आईला लासलगाव पोलिसांनी अटक केली आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीशी जामनेरचे नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी त्यांचा पुतण्या याच्याशी विवाह लावून दिल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या सर्व घटनेत त्या अल्पवयीन मुलीने 2 मार्चला पती वृषभ ललवाणी, चुलत सासरे असलेले जामनेरची माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह सुनील कोचर, चांदूलाल कोठारी, भावेश ललवाणी, विकास ललवाणी, भावना ललवाणी यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात आपल्या इच्छेविरुद्ध विवाह करून विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणातील अल्पवयीन मुलीने नोंदवलेली फिर्याद मागे घेण्यासाठी त्या मुलीच्या आईने पारस ललवाणी यांच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीची रक्कम स्विकारण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील टाकळी विंचुर शिवारातील ऐश्वर्या लॉज हे ठिकाण ठरले होते.

ठरल्या प्रमाणे सबंधीत महिला रक्कम स्विकारत असताना ललवाणी यांनी केलेल्या तक्रारीनुसार लासलगाव पोलिसांनी छापा टाकून अल्पवयीन मुलीच्या आईला पैशासह रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. तीच्यावर खंडणी घेतल्याचा गुन्हा लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यास पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com