लासलगाव पाणीपुरवठा योजनेस लवकरच कार्यारंंभ आदेश

16 गाव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात छगन भुजबळांच्या उपस्थितीत आढावा बैठक
लासलगाव पाणीपुरवठा योजनेस लवकरच कार्यारंंभ आदेश

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

लासलगाव (Lasalgaon) विंचूरसह (vinchur) सोळागाव पाणीपुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) कामास आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होणार असून नूतनीकरणाच्या कामास तातडीने सुरुवात करण्यात यावी अशा सूचना

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal) यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिल्या असून कुठल्याही परिस्थितीत योजनेचा वीजपुरवठा खंडित (Power outage) होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना महावितरणच्या (MSEDCL) अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहे.

लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठा योजना आढावा बैठक (Review meeting) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ (chagan bhujbal) यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) व पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal, Principal Secretary, Water Supply Department) यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत योजनेच्या कामाबाबत चर्चा केली.

यावेळी योजनेच्या कामास आठवडाभरात कार्यारंभ आदेश देण्यात येईल अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिली. यावेळी लासलगाव (lasalagaon) सरपंच तथा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर, पं.स. चे गटविकास अधिकारी संदीप कराड, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे, अ.पी. बिन्नर, उपअभियंता एस.मिस्त्री, महावितरणचे कार्यकारी अभियंता आव्हाड, उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे, प्रवीण सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गोसावी,

विस्तार अधिकारी एस.के. सोनवणे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, जी.टी. खैरनार, विंचूर सरपंच सचिन दरेकर, मंगेश गवळी, तुकाराम गांगुर्डे, पांडूरंग राऊत, लासलगाव उपसरपंच रामनाथ शेजवळ, योगेश पाटील, ललित दरेकर, गोकुळ पाटील, संतोष ब्रम्हेचा, मधूकर गावडे, डॉ.विकास चांदर, प्रदीप तिपायले, विनोद जोशी, महेश होळकर, अशोक होळकर आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सोळागाव पाणीपुरवठा योजनेसाठी दोन ठिकाणाहून पाण्याचे पंपिंग करावे लागते अशा वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाईपलाईन मधील पाणी पुन्हा मागे जाऊन प्रेशरमुळे पाणीगळती होणे, पाईपलाईन जिर्ण झाल्याने ती वारंवार फुटणे यामुळे पाणीपुरवठ्यास अडचणी येत आहे.

विजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी वीजवितरणने कायमस्वरुपी योग्य त्या उपाययोजना कराण्याचे निर्देश भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. तसेच या योजनेची पाईपलाईन जिर्णय झाल्याने जलजिवन मिशन अंतर्गत रेट्रोफिटीग योजनेअंतर्गत योजनेसाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र दरडोई खर्च आणि साहित्याचे दर वाढल्यामुळे योजनेच्या खर्चात अधिक वाढ होत असल्याने योजनेसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. निविदा प्रक्रिया झाली मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने दोन महिन्यांहून अधिक काळ खात्याचा कारभार पाहण्यासाठी मंत्री नसल्याने कार्यारंभ आदेशाला विलंब झाला.

आता या खात्यास पुन्हा गुलाबराव पाटील यांनी पद्भार स्वीकारला आहे. याबाबत मंत्र्यांशी आपण चर्चा केली असून आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन कामास सुरुवात होईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. भुजबळ पुढे म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात अधिक पाऊस झाल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे सोळागाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन उघडी पडल्याने पाणीपुरवठा बंद झाला होता. ही बाब लक्षात आल्यावर आपण तातडीने दोन दरवाजे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. मात्र गाळाचे प्रमाण अधिक असल्याने पाण्यातील गाळ कमी होण्यास अधिक विलंब झाला. तसेच काही काळ गढूळ पाणीपुरवठा झाला. त्यानंतर पुन्हा एकदा नियमित पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. पाणी गळतीचे प्रमाण अधिक असल्याने अडचणी येत होत्या. त्यानंतर जि.प. च्या माध्यमातून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्यात आला.

त्यातून लिकेजची कामे करण्यात येत आहे. तसेच काही प्रमाणात पाणीपुरवठा करण्यास विलंब होत आहे. आता मात्र पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यात येत आहे. ही योजना दुरुस्ती कामाला सुरुवात होईपर्यंत समितीने पाणीपुरवठा सुरळीत कसा राहील यासाठी नियोजन करावे अशा सूचना अधिकार्‍यांना दिल्या.

भुजबळांकडून रस्ता दुरुस्तीचे निर्देश

लासलगाव-विंचूर व कोटमगाव या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्ता चौपदरीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून त्यास विलंब होत असल्याने लासलगाव-विंचूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्टयांचे मजबुतीकरण करण्यात यावे. तसेच रस्त्याला अडथळा निर्माण करणार्‍या वृक्षांची छाटणी करावी. लासलगाव-कोटमगाव रस्त्याच्या साईडपट्टया मजबुतीकरण करावे. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे अशा सूचना भुजबळ यांनीं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com