लासलगाव पाणीप्रश्नी पालकमंत्री भुसेंना साकडे

शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे निवेदन
लासलगाव पाणीप्रश्नी पालकमंत्री भुसेंना साकडे

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

लासलगाव-विंचूर (Lasalgaon-Vinchur) सह सोळा गाव पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) गेल्या महिनाभरापासून ऐन पावसाळ्यात (monsoon) बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अधिकार्‍यांनी कागदी घोडे नाचविले तर पुढार्‍यांनी घोषणा केल्या. परंतु घोटभर पाणी मिळाले नाही.

त्यामुळे यासंदर्भात नवनिर्वाचित पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांची लासलगाव शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील (Lasalgaon Shiv Sena chief Prakash Patil) यांचेे नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने मालेगाव (malegaon) येथे भेट घेऊन पाणीप्रश्ना संदर्भात कैफियत मांडली.

त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (drinking water issue) तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री भुसे यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे. लासलगाव-विंचूर (Lasalgaon-Vinchur) ही आमदार छगन भुजबळ (MLA Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघातील गावे असून प्रकाश पाटील यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांना निवेदन (memorandum) देवून लक्ष वेधले होते.

त्यावेळी आमदार छगन भुजबळ यांनी अधिकार्‍यांसमवेत लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली होती. परंतु महीना उलटून देखील पाण्याचा प्रश्न सुटला नाही. लासलगाव-विंचूरसह सोळा गाव देखभाल दुरुस्ती समिती पदाधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे ऐन पावसाळ्यात देखील लासलगाव-विंचूर सह पाणीपुरवठा योजनेचे (Water Supply Scheme) लाभार्थी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करतांना दिसत आहे. नागरिक तहानलेलेच आहे.

सदर पाणीपुरवठा योजना तत्काळ दुरुस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Offices) पाच महिन्यापूर्वी तातडीची बैठक लावून 15 व्या वित्त आयोगातून लासलगाव ग्रामपंचायत 25 लाख रु., विंचूर 22 लाख रु., पिंपळगाव नजिक 9 लाख रु., टाकळी विंचूर 7 लाख रु. असे एकूण अंदाजे 64 लाख रु. खर्च करण्याचे प्रस्तावित असुन घोडे कुठे अडले तेच जनतेला समजत नाही. ही बाब शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या निदर्शनास आणून दिली.

भुसे यांनी सबंधित अधिकार्‍यांना पाईपलाईन तत्काळ दुरुस्ती करून ऐन सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. तसेच या नवीन पाईपलाईनसाठी 20 कोटी रुपये मंजूर असून याबाबतही पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करून काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सूचना केल्या.

त्यामुळे लासलगाव-विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होईल व कित्येक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल अशी जनतेला आशा आहे. मालेगाव येथे गेलेल्या या शिष्टमंडळात शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकास कोल्हे, कांदा व्यापारी प्रवीण कदम, विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष भैय्या नाईक आदींसह शिवसेना पदाधिकारी व लासलगाव, विंचूर परिसरातील ग्रामस्थांचा समावेश होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com