लासलगाव-विंचूर रस्ता चौपदरीकरण रखडले

लासलगाव-विंचूर रस्ता चौपदरीकरण रखडले
File Photo

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

लासलगाव ते विंचूर (Lasalgaon to Vinchur) हा 5 किलोमीटर रस्ता चौपदरीकरण (Four-laning of the road) नसल्यामुळे गेल्या 2 वर्षात 13 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर 13 नागरीक गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांच्या जीवावर उठलेल्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार कधी अशी मागणी जोर धरू लागल्याने संबंधित विभागाने रस्त्याचे काम तत्काळ सुरू करणे गरजेचे आहे.

गेल्या आठवडाभरापूर्वी विंचूर-लासलगाव रस्त्यावर (Vinchur-Lasalgaon road) रिक्षाला डंपरने धडक दिल्याने पाच निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. गेल्या कित्येक वर्षापासून लासलगाव ते विंचुर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. लासलगाव बाजारपेठेला जोडणार्‍या या रस्त्यावर शेतमाल वाहतूकी बरोबरच प्रवाशी वाहनांची मोठी वर्दळ असते.

अनेक रिक्षाचालक (Rickshaw puller) या रस्त्यावर प्रवाशी वाहतूक करतात. लासलगाव शहरातील मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले असून विंचूर रोड वरील रिक्षा थांबा पासून ते विंचूर स्मशानभूमी पर्यंत चौपदरीकरणाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. साहजिकच यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या रस्त्यावर गेल्या दोन वर्षात झालेल्या अपघातात 13 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

येथे शेतमाल घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. तसेच मुंबईकडे कांदा (Onion), मका शेतमालाची निर्यात होण्यासाठी दररोज शेकडो कंटेनर लासलगावला येत असतात. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. लासलगाव शहरातील रस्ता सिमेंट काँक्रीटचा (Road cement concrete) असून तो देखील अनेक ठिकाणी फुटला आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यावर डागडुजी करणे गरजेचे आहे. पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या मतदार संघातील असलेल्या या रस्त्याचे तातडीने चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

न्यायालयात दावा दाखल या रस्त्याप्रमाणेच लासलगाव-पिंपळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निफाड न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. या दाव्यामुळे सा.बा. विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम म्हणजेच खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. परंतु खड्डे बुजवितांना नियमाप्रमाणे न बुजविता ते घाईघाईत व व्यवस्थित बुजविले जात नाही. त्यामुळे पुढील पावसात पुन्हा खड्डे तयार होतात. त्यामुळे जेथे खड्डे बुजविण्याचे काम सुरू असेल तेथे नागरिकांनी व्हिडीओ काढून मला वैयक्तिक पाठवावे. तुमचे काम देश सेवेत हातभार लावणार आहे आणि तुमच्या व्हिडीओ मुळे चांगल्या दर्जाचे रस्ते मिळू शकणार आहे.

- अ‍ॅड. उत्तम कदम, अ‍ॅड. समीर भोसले

लासलगाव-विंचूर रस्ता संदर्भात निवेदन प्राप्त झाले असून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडून या रस्त्याच्या चौपदरीकरण संदर्भात सूचना आली आहे. त्यामुळे रस्ता चौपदरीकरणाबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची कारवाई तातडीने सुरू करण्यात येणार आहे.

- ए.पी. गोसावी, उपअभियंता सा.बा.

पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे गेल्या आठवड्यात आमचे सहकारी कुठलीही चुकी नसताना रस्ता अपघातात मयत झाले ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अशाच घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. त्यामुळे लासलगाव ते विंचुर या पाच किलोमीटर रस्त्याचे तातडीने चौपदरीकरण करणे गरजेचे आहे. पालकमंत्री व आमचे आमदार छगन भुजबळ यांनी या करिता लक्ष देणे गरजेचे आहे.

- कैलास भालेराव, रिक्षाचालक (विंचूर)

Related Stories

No stories found.