लासलगाव दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज ठप्प

लासलगाव दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज ठप्प

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

मंगळवारपासून बीएसएनएलची इंटरनेट Internet services of BSNL सेवा बंद असल्याने लासलगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे Secondary Registrar's Office कामकाज ठप्प work stalled झाल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. तर दस्त नोंदणी करणार्‍या पक्षकारांना निफाड व पिंपळगावला जावून दस्त नोंदणीसाठी मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्यात खरेदी विक्री अधिक प्रमाण असल्याने निफाड, लासलगाव व पिंपळगाव या तीन ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. लासलगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील बीएसएनएल सेवा मंगळवारपासून ठप्प झाल्याने नोंदीचे काम बंद पडले आहे. असा प्रकार वारंवार घडत असून बीएसएनएल अधिकार्‍यांच्या बेपर्वाईमुळे नोंदणीचे काम ठप्प होत असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार असे चार दिवस आगाऊ दस्त नोंदणी केलेल्या पक्षकारांना दुसर्‍यांदा डाटा एन्ट्री चा खर्च सहन करावा लागला व त्यांची टोपण काढावे लागले. टप्पा असल्याने दस्त नोंदणी झालीच नाही. त्यामुळे ऐनवेळेस निपाणी पिंपळगाव येथे जाऊन आपले दस्त नोंदणी करावी लागली तर काहींना सुट्टी मिळाल्याने दस्त नोंदणीचे काम करता आले नाही.

तालुक्यातील खरेदी खत त्यातही जमीन विक्री होताना ते तातडीने पक्षकार पाहतात. परंतु शासनाची सेवा ठप्प असल्याने व अधिकारी याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचा लासलगाव येथे जमा होणारा महसूल बुडाला आहे. शासनाची इंटरनेट सेवा बंद करणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध वरिष्ठ अधिकार्‍यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.