MSRTC
MSRTC
नाशिक

लासलगाव-नाशिक आजपासून बससेवा

Abhay Puntambekar

लासलगाव। प्रतिनिधी Lasalgaon

आगारातून सुटणारी लासलगाव ते नाशिक चांदोरी मार्गे बससेवा आज सोमवार दि.१७ पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख एस.एन. शेळके यांनी दिली.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दि.२३ मार्चपासून लासलगाव ते नाशिक येथे धावणारी बस सेवा बंद करण्यात आली होती. येथील प्रवाशांनी ही बस सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती.

लासलगाव ते नाशिक व नाशिक ते लासलगाव या मार्गावर चांदोरी मार्गे आजपासून दररोज दोन अशा एकुण चार फेर्‍या सुरू होणार आहे. ज्येष्ठ नागरिक व बारा वर्षाखालील मुलांना बसने प्रवास करता येणार नाही. तसेच मास्क शिवाय बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे अशी माहिती लासलगाव बस आगारप्रमुख एस.एन. शेळके यांनी दिली.

लासलगाव येथून दररोज सकाळी ९ व दुपारी २ वाजता बस निघून ती नाशिक महामार्ग बसस्थानक येथे जाईल व नाशिक महामार्ग बसस्थानक येथून दररोज ११.३० व सायं. ५ वाजता चांदोरी मार्गे ही बससेवा सुरू होणार असल्याचे बस आगार प्रमुख शेळके यांनी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com