लासलगाव रुग्णालय शस्त्रक्रिया गृह दोन महिन्यांपासून बंद

लासलगाव रुग्णालय शस्त्रक्रिया गृह दोन महिन्यांपासून बंद

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

येथील ग्रामीण रुग्णालयातील (Rural hospital) ऑपरेशन थिएटर (Operation theater) केवळ पावसाच्या गळतीमुळे दोन महिन्यापासून बंद असल्याने येथील रुग्णालय रुग्णांसाठी केवळ शोभेचे बाहुले ठरले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर तत्काळ चालू करून रुग्णांची गैरसोय दूर करावी.

तसेच रिक्त जागा तत्काळ भराव्यात अशी मागणी लासलगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील (Lasalgaon Shiv Sena taluka chief Prakash Patil) यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांच्याकडे केली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात पाच वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून रुग्णांसाठी रुग्णालयात ऑपरेशन थिएटर सुरू केले होते. मात्र सद्यस्थितीत पावसाच्या गळतीमुळे हे ऑपरेशन थिएटर तब्बल दोन महिन्यांपासून बंद आहे.

त्यामुळे महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (Family planning surgery), प्रोस्कोपीक शस्त्रक्रिया (Proscopic surgery), सिजर (Caesar), गर्भपिशवी शस्त्रक्रिया, गर्भपात आदी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. ज्या रुग्णांना तत्काळ शस्त्रक्रिया गरजेची आहे अशा गरजू रुग्णांना नाइलाजाने खासगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागत असल्याने रुग्णांची आर्थिक कुचंबना सुरू आहे. त्यामुळे केवळ ऑपरेशन थिएटर (Operation theater) बंद असल्याने या ठिकाणी स्रीरोगतज्ज्ञ (Physiologist) आणि भूलतज्ज्ञ (Anesthetist) असून देखील उपयोग नाही. तसेच या रुग्णालयात एक्स-रे मशीन (X-ray machine) उपलब्ध आहे परंतु तंत्रज्ञ नाही.

त्यामुळे हे रुग्णालय असून अडचण नसुन खोळंबा ठरत असल्याने परिसरातील रुग्णांनी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असून निफाड तालुक्यातील मोठे शहर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक ये-जा करतात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह बाहेरील रुग्णांची ही गैरसोय होत असल्याने रुग्णांना निफाड, पिंपळगाव बसवंत, नाशिक अशा दूरवरच्या दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावे लागत आहे.

त्यामुळे येथील ऑपरेशन थिएटर तत्काळ सुरू करून येथील रिक्त पदे देखील भरण्यात यावी अशा मागणीचे निवेदन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांसह संचालक आरोग्य भवन मुंबई, उपसंचालक नाशिक मंडळ, जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही पाठविण्यात आल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, निवृत्ती जगताप, बाळासाहेब जगताप, प्रमोद पाटील, विकास रायते, केशव जाधव, राकेश रायते, निरंजन शिंदे, उत्तम वाघ, वसंत शिंदे, बाळासाहेब शिरसाट, सुनील आब्बड, माधव शिंदे, रविराज बोराडे, संतोष पवार, नवनाथ श्रीवास्तव यांचेसह पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

रुग्णालयात रिक्त पदे

सहाय्यक अधिक्षक : 1

एक्सरे तंत्रज्ञ : 1

अधिपरीचारीका : 3

कक्ष सेवक : 2

सुरक्षारक्षक : 1

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com