
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
नाशिक (nashik) शहर व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना, व्यथा मांडण्यासाठी नाशिक शहर काँग्रेस सेवादलाच्यावतीने (Nashik City Congress) कांद्याची (onion) ८ बाय ५ फुटांची प्रतिकृती तयार करून काँग्रेस भवन, एम.जी.रोड येथे गुरुवारी (दि.१६ ) सकाळी ११ वा. अनोखे आंदोलन (agitation) केले जाणार आहे.
यातून राज्य सरकारला (State Govt) इशारा देत शेतकऱ्यांच्या (farmers) व्यथा समजून शेतमालाला सरसकट मदत मिळावी, यासाठी निदर्शने करून जनतेच्या जनभावना लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात येणार आहेत. या भावना राज्यपाल (Governor) यांना कळवण्यात येणार आहेत, अशी माहिती नाशिक शहर काँग्रेस सेवादळाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर (Dr. Vasant Thakur) यांनी दिली.
यावेळी आजी-माजी खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, अल्पसंख्याक विभाग, अनुसूचित जाती-जमाती विभाग, ओबीसी विभाग, सोशल मीडिया, असंघटित कामगार काँग्रेस विभाग, व्हीजेएनटी विभाग, विज्ञान विभाग व सर्व सेल च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.