नवीन नाशिक | Nashik

महापालिका एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा अशी जनजागृती करत असताना दुसरीकडे मनपाच्या हद्दीतच विनापरवाना वृक्षतोड सुरु असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे.

याबाबत गुन्हे दाखल करून कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिक व वृक्षप्रेमींनी केली आहे.

अंबड येथील शेतात गट नं. 13 व 110 येथे अनेक वृक्षांची सर्रासपणे कत्तल करण्यात आली आहे. अनेक मोठे वृक्ष जेसीबीच्या साहाय्याने मुळापासून व खोडापासून तोडून टाकण्यात आले आहेत.

याबाबत येथील नागरिकांनी व पर्यावरण संस्थांची तक्रार केली असून ज्या व्यक्तीने हा प्रकार केला त्याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीत तोडण्यात आलेल्या झाडांबाबत कारवाई गुलदस्त्यात आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो झाडे तोडण्यात आली आहेत.

याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कारवाई करण्यात आलेली नसल्याने मनपाच्या दिरंगाईबाबत संशय व्यक्त केला जात आहे. यासोबतच पवननगर समोरच्या बाजूला एका ठिकाणी झाडाच्या फांद्या छाटणीच्या वेळी संपुर्ण झाडच तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

वृक्षतोड हा गंभीर गुन्हा आहे. याबाबत फौजदारी गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार कुणी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही सहन करणार नाही.जी झाडे तोडली तिथे पुन्हा झाडे लावावी.

आबा पाटील, अध्यक्ष,

जीवन नागरी पर्यावरण संस्था याप्रकरणी संबंधित व्यक्तीला नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबत अभियंता नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकालाही नोटीस बजावली आहे. याबाबत लवकरच तपास करून गुन्हा दाखल करण्यात येईल.

प्रशांत परब, उद्यान आधिकारी, नवीन नाशिक