सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड

सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

सध्या सोयाबीनचे दर गगनाला भिडण्याच्या संकेतामुळे सोयाबीन क्षेत्र वाढले आहे. दिंडोरी तालुक्यातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड ( cultivation of soybeans )करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत 90 रुपयांच्या पुढे दर असून, दरात असलेले तेजीचे वातावरण भविष्यातही राहील, असा अंदाज बांधत सोयाबीन लागवडीसाठी शेतकरी सरसावले आहे. सोयाबीन या पिकावर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी व हमखास आर्थिक स्थैर्य देणारे पीक अशी ओळख आहे.

दरम्यान, सोयाबीन हे प्रामुख्याने धुळे( Dhule) येथे विक्री करण्यात येते. सोयाबीनच्या पावडरपासून तेल तयार करणे, प्रोटीन्स तयार करणार्‍या पदार्थांमध्ये वापरणे, सोयाबीनची वडी तयार करणे असा वापर सोयाबीनचा करण्यात येतो. मात्र प्रामुख्याने धुळे येथील ऑईल मिलमध्ये तेल उत्पादनासाठी सोयाबीन खरेदी करणार्‍या अनेक मिल आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com