डेंगी, मलेरियाच्या साथीने नाशिककर त्रस्त

डेंगी, मलेरियाच्या साथीने नाशिककर त्रस्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरासह जिल्ह्यात करोना (Corona) नियंत्रणात येत असतानाच डेंगी (Dengue) व मलेरिया (Malaria) रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे...

शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रोजच डेंगी तसेच मलेरियाचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. सध्या जलजन्य आजारांची साथ आली असली तरी नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही.

आपल्या भागाची स्वच्छता ठेवावी. डासांची (Mosquitoes) उत्पत्ती होऊ नये यासाठी पाणी साचणार नाही याबाबत काळजी घेत राहावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात (Dr. Ashok Thorat) यांनी केले आहे.

साथीचे आजार वाढले त्यामुळे साहजिकच संबंधित रक्त चाचण्या व इतर आवश्यक तपासण्यांची संख्याही वाढत आहे. ताप, थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी आदी लक्षण असलेल्या रुग्णांची (Dengue and Malaria Patients) संख्या बऱ्यापैकी दिसून येत आहे.

रुग्णांची रक्त चाचणी अहवाल (Blood test report) येईपर्यंत संबंधित रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात येत आहे. यात लहान मुलांचादेखील मोठ्या संख्येने सहभाग आहे. ताप, थंडीचे रुग्ण आढळून येत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना डेंगी किंवा मलेरियाच्या दृष्टीने उपचार करण्यात येत आहे.

दरम्यान खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपा प्रशासनाने ठिकठिकाणी फवारणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी आजार अंगावर न काढता ताबडतोब रुग्णालयात वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.