त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwar

येथे गेल्या महिनाभरापासून त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी भाविकांची (Devotees) गर्दी उसळत आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar temple) मोफत दर्शनाससह (Free darshan) पेड दर्शनासाठी भाविकांची रांग लागल्याचे चित्र दिसत आहे.

.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजावर (east door) वातानुकूलित अत्याधुनिक अशी सात कोटी रुपये खर्चाची दर्शनबारी बांधण्यात आलेली आहे. सर्व विश्वस्तांनी लक्ष घातल्याने दर्शन बारीतून सुरळीतपणे मोफत दर्शन यात्रेकरू भाविकांना घेता येते.

तसेच भाविकांकडून कधी रांगेत थांबण्याची तयारी नसल्याने तर कधी लहान अथवा वयस्कर व्यक्तीसोबत असल्यामुळे पेड दर्शन घेतले जाते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पेड दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मोफत दर्शन रांगेवर जास्त ताण येऊ नये यासाठी काही काळ पेड दर्शन तिकीट विक्री बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com