जिल्हाधिकारी कार्यालय हाऊसफुल; 'हे' आहे कारण

जिल्हाधिकारी कार्यालय हाऊसफुल; 'हे' आहे कारण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दोन आठवड्यापासून सुरु असलेला महसूल कर्मचाऱ्यांचा संप (Revenue employees strike), सलग चार दिवस लागून आलेल्या सुट्या यामुळे सर्वसामान्यांची अनेक कामे प्रलंबित होती....

आज सोमवार (दि.१८) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) सुरु झाल्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्यांची गर्दी वाढत गेली. एकाच वेळी गर्दी एवढी वाढली की, १२ ते १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

दरम्यान, दररोज जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित कामे घेउन येणाऱ्यांची संख्या मोजकीच असते. मात्र, ३ एप्रिलपासून महसूल कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी बेमुदत संप (Strike) पुकारला होता.

तसेच गेल्या आठवड्यात गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti), शुक्रवारी गुड फ्रायडे (Good Friday) आणि त्यानंतर शनिवार आणि रविवार शासकीय सुट्या अशा एकूण सलग चार दिवस सुट्या लागून आल्याने नागरिकांचे अनेक कामे प्रलंबित राहिले होते. आज कार्यालय नियमित सुरु झाल्याने नागरिकांची एकच गर्दी कार्यालयाच्या विविध विभागांमध्ये झाली होती.

नागरिकांची वाहने देखील मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावली होती. पार्किंग (Parking) फुल झाल्याने स्मार्ट रोडवर (Smart Road) दुचाकी, चारचाकी वाहने पार्क केल्याने वाहतूकदेखील काही काळ खोळंबल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.