रेल्वे भूयारी मार्गावर पाणीच पाणी

रेल्वे भूयारी मार्गावर पाणीच पाणी

येवला । सुनील गायकवाड

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बहुतांश रेल्वे मार्गावर रेल्वे गेट अस्तित्वात होते. मात्र रेल्वे मार्गावरील (Railway line) फाटके बंद करून रेल्वे मार्गाखालून पर्यायी भूयारी मार्ग (Underground Road) तयार करण्याची कल्पना सुचवण्यात आली आणि ते मार्ग तयारही करण्यात आले. मात्र फाटके कायम स्वरूपी बंद करून प्रवासी व स्थानिकांच्या सोईसाठी तयार करण्यात आलेला भुयारी मार्ग म्हणजे असून अडथळा ठरत आहे...

परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी मनमाड-सोलापूर रेल्वे मार्गावर (Manmad-Solapur railway line) तसेच नाशिक-मनमाड रेल्वे मार्गावर (Nashik-Manmad railway line) रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) ज्या-ज्या ठिकाणी गावाजवळ असलेल्या रेल्वे फाटके कायम स्वरुपी बंद करुन त्याच्या बाजूलाच जेथे योग्य असेल तेथे रेल्वे मार्गाच्या खालून भूयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.

आता हेच भुयारी मार्ग पावसाळ्यात जाण्यायेण्यासाठी अडथळा ठरत आहे. कारण एकदा पाऊस आला तरी अनेक दिवस या भूयारी मार्गात पाणी साचत आहे. भूयारी मार्गात सुमारे चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचलेले असल्याने स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

रेल्वे गेट असलेल्या मार्गावर रेल्वे गाडी जाण्यायेण्याच्या वेळेस सुमारे दीड तास गेट बंद राहत असल्याने प्रवाशी तसेच वाहनधारकांना येथे ताटकळत थांबावे लागत होते. रेल्वे प्रशासनाने तेव्हा फाटक बंद असताना प्रतीक्षा करणार्‍या प्रवाशांना आता पर्यारी मार्ग वापरणे, किंवा प्रतिक्षा करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

भूयारी मार्गांची निर्मिती केल्यामुळे प्रवाशी व वाहनधारकांना दिलासा मिळाला होता. मात्र या भूयारी मार्गात पाणी साचून वाहतूक () पूर्णत: बंद होते. या भागातील शेतमाल लासलगाव, येवला, मनमाड किंवा इतर बाजार पेठेत विक्रीसाठी नेण्यासाठी हाच मार्ग जवळचा आहे. यातून शेतकर्‍यांचा वेळ व पैशाची बचत होते. मात्र पावसाचे पाणी साचल्याने हे सर्वच भूयारी मार्गातून प्रवास करताना अडथळा निर्माण होत आहे.

मनमाड-सोलापूर या रेल्वे मार्गावर असलेल्या येवला (Yeola) तालुक्यातील नांदूर रेल्वे गेट, धामोडे रेल्वे गेट, अनकुटे रेल्वे गेट या सर्वच भुयारी मार्गांची अवस्था वाईट झाली आहे. ग्रामस्थ तसेच प्रवाशांची सोय होण्याऐवजी गैरसोयच जास्त झाली आहे.

- प्रवीण येवले, धामोडे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com