गंगाद्वारला दरड कोसळली, सुदैवाने दुर्घटना टळली

संरक्षक जाळ्या बसवण्याची मागणी
गंगाद्वारला दरड कोसळली, सुदैवाने दुर्घटना टळली

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

येथील गंगाद्वार पर्वतावर (Gangadwar ) आज सकाळच्या सुमारास गोमुख स्थानासमोर दरड (Landslide) कोसळली. सुदैवाने लॉकडाऊनमुळे (Lockdown) मोठी दुर्घटना टळली.

त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वारवर कोलंबिका देवीचे (Kolambika Temple) मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात आज सकाळच्या सुमारास दरड कोसळली. यात पर्वतावरून लहान मोठे दगड यावेळी खाली पडले. सध्या लॉकडाऊन असल्याने भाविकांची (Devotees) संख्या कमीच आहे. त्यामुळे दुर्घटना टळली.

दरम्यान याआधीही अनेकवेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, आणि भाविकही जखमी झाल्याची माहिती येथील गंगाद्वार पर्वतावरील गंगा गोदावरी मंदिराचे पुजारी आशुतोष महाजन यांनी दिली.

दरम्यान सप्तशृंगी गड (Saptsrungi Gad) येथे डोंगरावर धोकादायक ठिकाणी ज्या पद्धतीने जाळ्या बसवल्या आहेत, त्या पद्धतीचे नियोजन ब्रम्हगिरी पर्वतावर (Bramhgiri Mountain) करावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावावेत अशी मागणी श्री शंभू पंचायती अटल आखाड्याचे महंत उदयगिरिजी महाराज यांनी केली आहे.

तसेच ब्रह्मगिरी पट्ट्यातील धोकादायक ठिकाणांचा शासनाने, वनखात्याने शोध घ्यावा असेही ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com