सप्तशृंगी घाटात दरड कोसळली

सप्तशृंगी घाटात दरड कोसळली

वणी । Vani

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर (Saptashrungi gad) सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे (rain) गडशिखरावरुन येणाऱ्या पाण्याच्या वेगामुळे नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट (Nanduri to Saptashrungi Gad Ghat) रस्त्यावर चार वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याची (landslide) घटना घडली...

याबाबतची माहिती पोलिस (police) ग्रामपंचायत (Gram Panchayat) पदाधिकारी व ट्रस्ट प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागास (Public Works Department) कळवून घाटातील दरड (landslide) जेसीबीच्या साह्याने बाजूला करत घाट रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

दरम्यान, मंदिरात जाण्याची पहिली पायरी ते मंदीर मार्ग सुरळीत सुरु असून मंदीरातून परतीच्या पायरीवरील मार्ग मलबा हटविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला असल्याची माहीती ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी (Public relations officer) भिकन वाबळे (Bhikan Wabale) यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com