निफाड । Niphad

बेरवाडी ते सावळी शिवारात सोमवारी लांडोर वेगळाच आवाज देत असल्याने व तिची होणारी घालमेल बघता येथील संजीव गिरी यांना सदर लांडोरीचा जोडीदार मोर हा काटेरी बाभळीच्या झाडावर अडकून पडल्याचे व या मोराची सुटका करण्यासाठी लांडोरची घालमेल त्यांना दिसून आली.

परिणामी तेथील नागरिकांनी झाडाच्या फांद्या तोडून मोराची सुटका केल्याने मोर व लांडोर यांचे एकमेकावर असलेले प्रेम या संकटकाळात केलेल्या मदतीने अधिक अधोरेखित होऊन त्याचीच चर्चा परिसरात रंगली.

‘एक दुजे के लिये’या चित्रपटाला शोभावे असेच कथानक बेरवाडी शिवारात घडले. भक्ष्य शोधण्याच्या नादात मोर उडत-उडत बाभळीच्या झाडावर जाऊन बसला अन् झाडावरतीच अडकून पडला. मोर अडकल्याचे कळताच लांडोर ने वेगवेगळे आवाज काढत मदतीचा धावा केला. या आवाजाच्या दिशेने गावातील काही नागरिक रेस्क्यू साठी निघाले.

परिणामी लांडोर पुढे व सदर नागरिक पाठीमागे चालत चालत बाभळीच्या झाडापर्यंत गेले. तेथे गेल्यावर त्यांना मोर झाडावर अडकून पडल्याचे दिसले. यावेळी त्यांनी झाडाच्या फांद्या तोडून मोराची सुटका केली.

दरम्यान वर्षभरापूर्वी देखील संजीव गिरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोर व लांडोर या जोडीला दाणा-पाणी केल्याने त्यांनी आता इथेच आपले बस्तान बसविले. दोघेेही येथील माणसात आता मिसळून गेले आहे. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे आणि संकटात जोडीदाराच्या मदतीला धाऊन जाणार्या मोर व लांडोरची चर्चा संपूर्ण बेरवाडी व सावळी शिवारामधील नागरिकांमध्य चर्चो रंगली आहे.