जमीन सर्वेक्षण मोहीम ठप्प

जमीन सर्वेक्षण मोहीम ठप्प

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील जमिनीची ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा Land survey by drone निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, जिल्ह्यात ड्रोन Drone अभावी ही सर्वेक्षण मोहीम पूर्ण ठप्प झाली आहे.विशेष म्हणजे, नाशिक विभागात जमीन सर्वेक्षणासाठी अवघे एकच ड्रोन उपलब्ध आहे. तेही उपलब्ध होणार की नाही याबाबत साशंकता असून सर्वेक्षणाला लवकर मुहूर्त कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे जिल्ह्यातील जमिनींचेे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ड्रोनद्वारे होणार्‍या या मोजणीमुळे हद्दींचे नकाशे उपलब्ध होणार असून, जमीन मोजणीची प्रक्रिया सोपी होऊन नागरिकांना मालमत्तांच्या मालकीहक्कांचे प्रमाणपत्र मिळू शकणार आहेत.

जिल्ह्यातील सरकारी, खासगी, गायरान आणि इतर सर्वच प्रकारातील जमीनींची अद्यावत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने ड्रोन सर्वेक्षण सुरु केले आहे. जमिनीचे क्षेत्र व मालकी यावरुन प्रचंड वाद आहे. कारण स्वतंत्र्यानंतर जमिनींचे सर्वेक्षण झाले नसल्याने त्याबाबतच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. शासकीय योजनांसाठीही अनेकदा जमीन संपदानास अडचणी येतात.

याच प्रमुख कारणाने राज्यातील जमिनींची मालकी, शासकीय जमीनी, त्यावरील अतिक्रमणे, शेतीची, वन विभागाची आणि इतर जमिनी, शासकीय प्रकल्पांसाठी जागेचा शोध, यासह जमिनींची मालकी व अधिकृत माहीतीसाठी शासनाने जमीनींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात मात्र सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेले ड्रोनच उपलब्ध झालेले नाहीत. नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, आणि जळगाव या पाचही जिल्ह्यांसाठी मिळून अवघ्या एकच ड्रोनला परवानगी दिली आहे. हे ड्रोन उपलब्ध झाल्यानंतरच जिल्ह्यात जमीन मोजणीला मुहूर्त लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com