चेन्नई - सुरत ग्रीन फिल्ड महामार्गासाठी 'या' महिन्यात होणार भूसंपादन

File Photo
File Photo

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

भारतमाला प्रकल्पांतर्गत 'ग्रीन फिल्ड महामार्ग' (Green Field Highway) संकल्पनेनुसार चेन्नई - सुरत ग्रीन फिल्ड महामार्गासाठी

जिल्ह्यातील चार तालुक्यामध्ये मार्च अखेर भूसंपादन (Land acquisition) करण्याचे शासनाचे नियोजन आहे. जिल्ह्यात सहा तालुक्यांतून जाणाऱ्या या मार्गासाठी चार तालुक्यांत भूसंपादनाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

या महामार्गासाठी नाशिक (nashik), नगर (Ahmed Nagar), सोलापूर (solapur), हैदराबाद (Hyderabad), चैन्नई (chennai) ही औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील (nashik district) ६०९ गावांमधून जाणाऱ्या या महामार्गासाठी ९९६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. नाशिक- सुरत अवघे १७६ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या दोन तासांत सुरत शहर गाठता येईल.

हैदराबाद येथील आर्वी असोसिएटस आर्किटेक्चर डिझायनर कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीला रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात १२२ किलोमीटर अंतर असून, त्यासाठी ९९७ हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर अशा सहा तालुक्यांतील ६९ गावांचा समावेश आहे. त्यापैकी एकट्या दिंडोरीतील सर्वाधिक २३ गावांचा समावेश आहे.

या गावात होणार भूसंपादन

दिंडोरी : तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे,बुद्रुक, जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढकांबे, शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहुर. पेठः पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडवारी, हरणगाव.नाशिकः आडगाव, ओढा, विंचुरगवळी, लाखलगाव. निफाड : चेहडी खुर्द, चाटोरी, वरहे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी. सिन्नर : देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागावपिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com