जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण; उपचारासाठी शेतकऱ्यांची धावपळ

जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण; उपचारासाठी शेतकऱ्यांची धावपळ

ठाणापाडा | वार्ताहर Nashik

बोरगाव घाटमाथ्यावरील परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासून जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता जाता त्वरित उपचारासाठी बोरगाव पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा असे आवाहन डॉ . ललिता नाळे यांनी केले आहे....

बोरगाव, सराड, हिरीडपाडा, पोहाळी, पासोडी, पायरपाडा, साजोळे आदी गावांमध्ये जनावरांना विषाणू जन्य लम्पी स्कीन डिसिजचा त्त्वचारोग धोका बळावला आहे. या आजारावर औषध उपलब्ध असल्याने शेतकरी आणि पशुपालकांनी जनावरांसाठी उपचारासाठी दाखल करण्यात यावं.

त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पशू वैद्यकीय दवाखान्यात गर्दी करतात. पशुपालकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

लम्पी स्कीन डिसिजन हा प्रामुख्याने गोवंसीय जनावरांना, गाई, बैल वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. हा रोग सर्व वयोगटातील गोवंसीय जनावरांना होतो. लहान वासरे या रोगास अधिक प्रमाणात बळी पडतात.

हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दुध उत्पादन क्षमता घटते, सुरवातीला दोन तीन दिवस जनावरांना बारीक ताप जाणवतो, कडक व गोल आकाराच्या गाठी येतात, या गाठी साधारणपणे पाठ पोट पाय व जननेंद्रिय आदी भागात येतात.

बाधित जनावरांच्या डोळ्यातुन व नाकातून पाणी येतंय, तोंडातील वर्णामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पाण्यावरील गाठी मुळे जनावरांना चालताना त्रास होतो. त्यामुळे आजारांपासून बचावकरण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवणे, गोठ्यात पाणी साचू देऊ नये यासाठी नियोजन करणे असं आवाहन डॉ . ललिता नाळे, डॉ , शिवाजी गुडगे, निमदेव चौधरी, सागर गांगोडे , महेश चौधरी आदी दवाखान्यातील कर्मचारी चे प्रयत्न चालू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com