लॅमरोडचे काम रखडले; आ. सरोज अहिरेंच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

लॅमरोडचे काम रखडले; आ. सरोज अहिरेंच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Deolali Camp

देवळाली कॅम्पचे (Devali Camp) प्रवेशद्वार असलेल्या वापर देवळाली (Deolali), भगूर (bhagur) या शहरासह परिसरातील 52 खेडी करतात.

आ. सरोज आहिरे (MLA Saroj Ahire) यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (Public Works Department) हा रस्ता दुरुस्ती (road repair) करणेकामी 5 कोटीचा निधी (fund) मंजूर करून प्रत्यक्षात काम सुरू झाले.

मात्र, अद्यापही रस्ता अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. याबाबत आ. अहिरे यांनी तातडीने लक्ष घालून दिवसात थांबलेले काम सुरू करावे. अन्यथा, त्यांच्या कार्यालयासमोर लोकशाही (Democracy) मार्गाने उपोषणास बसण्याचा इशारा जनतेच्या वतीने पवन आडके व त्यांच्या सहकार्याने दिला आहे.

लॅमरोडवर (Lam Road) पूर्वी पडलेले खड्डे (potholes) जनतेच्या आजारपणास कारणीभूत ठरत होते. सदर रस्ता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Cantonment Board) आखत्यारित असल्याने 2020 मध्ये आ. अहिरे यांनी बोर्डाच्या माध्यमातून तो शासनाकडे वर्ग करून घेतला. रस्त्यासाठी राज्य शासनाचा (state government) 5 कोटीचा निधी मिळवून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू झाले. माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Former Minister of State for Public Works Prajakta Tanpure) यांनी या रस्त्याचे सहा महिन्यापूर्वी उदघाटन केले होते.

दिवाळीपूर्वी हा रस्ता जनतेला उपयोगातील येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराच्या मनमानी पद्धतीमुळे आहे तो रस्ता देखील पावसाने खराब आहे. याबाबत अनेक संघटना व नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे डोळेझाक करत असल्याने जनतेचा रोष वाढत आहे. जनतेसाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. येत्या आठ दिवसात रस्ता कामास सुरुवात न झाल्यास नागरिकांसह आपण आ. अहिरे यांचे कार्यालयासमोर उपोषणाच बसणार असल्याचा इशारा आडके व त्यांच्या सहकार्‍यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com