
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad
ड्रग्ज प्रकरणी पकडण्यात आलेला मुख्य संशयित आरोपी ललित पाटील याची मैत्रीण एडवोकेट प्रज्ञा कांबळे हिला गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर तिला चौकशीसाठी आज पुन्हा नाशिकरोड येथील तिच्या निवासस्थाने आणले होते.
ड्रग प्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी ललित पाटील याच्या दोन मैत्रिणी अर्चना निकम व प्रज्ञा कांबळे यांना गेल्या आठवड्यात नाशिक रोड येथून त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. त्यापैकी प्रज्ञा कांबळे ही नाशिक रोड येथील दत्त मंदिर परिसरात असलेल्या ओनियन स्पेस या इमारतीत राहत असून या ठिकाणी आज पुन्हा तिला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी आणले होते.
याविषयी पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली होती. प्रज्ञा कांबळे हिला घरी नेऊन त्या ठिकाणी सुमारे पुणे पोलिसांनी दोन तास तिची चौकशी केली होती या चौकशी बाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली. दरम्यान ललित पाटील हा सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला पुणे पोलीस ताब्यात घेणार असून मुंबई पोलिसांचे चौकशी संपल्यानंतर पुणे पोलीस त्याला ताब्यात येथील त्यानंतर त्याच्याकडून बरेच माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरण संपूर्ण भारत देशात चर्चा होत असून त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापले आहे. ललित पाटील याचे नाशिकमधील अनेक राजकीय नेत्यांशी संबंध होते. त्यामुळे हे राजकीय नेते सुद्धा अडचणीत आले आहे.