नाशिक l Nashik

कॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कल, नाशिक आयोजित वसंत करंडक जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धा (दि. 17) मार्च रोजी कालिदास कला मंदिर, शालिमार, नाशिक येथे पार पडली.

सदर स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून यावेळी सौदर्य निर्मिती थिएटर प्रस्तुत, बट बिफोर लव्ह, नाट्यरसिक प्रस्तुत, मृगजळ, फिल्मसिटी रुद्राक्षम थिएटर, पिगमेंट एस. पी. प्रॉडक्शन प्रस्तुत, संबंध, ड्रामा डेडीफिटेड प्रस्तुत भोकरवाडीचा शड्डू, नाट्यसेवा थिएटर प्रस्तुत, बाई जरा कळ काढा, सपान प्रस्तुत लाली, रेकीरे प्रॉडक्शन थिएटर प्रस्तुत, मृतकाचे नाव काय?.

इत्यादी संघांनी एकांकिका स्पर्धेत भाग घेतला असून सपान प्रस्तुत कृष्णा वाळके लिखित लाली या एकांकिकेने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.

यावेळी सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम - लाली (सपान, नाशिक),

सर्वोत्कृष्ट लेखक प्रथम - कृष्णा वाळके,

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम - राहुल गायकवाड,

सर्वोत्कृष्ट संगीत प्रथम - रोहित सरोदे - जितेंद्र सोनार,

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना प्रथम - मोहन अगवाने,

सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम - चेतन बर्वे - सौरभ महाजन,

सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री द्वितीय - मानसी गोसावी (पात्र - आवली), सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष प्रथम - प्रणव सपकाळे (पात्र-किसण्या ) अशा सर्वच घटकात सपान प्रस्तुत लाली या एकांकिकेने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

यावेळी उपस्थित मानव्यवरांनी विजेत्यांचे कौतुक तसेच अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.