लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी एकाच दिवशी

लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी एकाच दिवशी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दिवाळीचा सण Diwali Festival सर्वत्र साजरा होत आहे. दिवाळातील सर्वात महत्वाचा दिवस लक्ष्मीपूजन आज आहे. यंदा नरकचतुर्दशी Narak Chaturdashi व लक्ष्मीपूजन Lakshmipujan एकाच दिवशी आले आहेत.

लक्ष्मीचे वर्णन धर्मशास्त्रात धनाची देवता म्हणून केले जातेे. ज्योतिष शास्त्र लक्ष्मीला धनाची देवी मानते. लक्ष्मीच्या कृपेने माणसाच्या जीवनात सुख-समृद्धी येते. कलियुगात लक्ष्मीजींचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा मानला जातो. अशी अनेकांची भावना आजही कायमआहे. लक्ष्मीला धन, संपत्ती, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.व्यापीक उद्योजकांचे नवीन आर्थीक वर्ष लक्ष्मी पूजनानंतरच सुरु होते. त्यामुळे हिशोबाच्या वह्या, चोपड्यांचे पूजन भक्तीभावाने केले जाणार आहे.

दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन शुभमुहूर्तावरच केले जाते. यंदा नरक चर्तुदर्शी पहाटे आहे. त्यामुळे नरक चर्तुदशीचे अभ्यंगस्नान सकाळी सहा वाजून 41 मिनिटांपर्यंंत म्हणजे सूर्योदयापुर्वी होईल. त्यानंतर आमावस्या सुरु होत आहे.

लक्ष्मी पूजनाचे मुहुर्त

अमावस्या तिथी सकाळी 6:3 पासून सुरु होईल. अमावस्या 5 नोव्हेंबर पहाटे 2:44 पर्यंत असेल. लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त : 6:9 ते 8:20 असा 1 तास 55 मिनिटांचा आहे. त्यामुळे सायंकाळी याच काळात घरोघरी लक्ष्मीपूजन होऊन दिवाळीचा जल्लोष साजरा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com