घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक । प्रतिनिधी । Nashik

अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत दोन विविध ठिकाणी झालेलया घरफोडीत (Burglary) अज्ञात भामट्यांनी लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह (Gold silver jewelry) रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल (case filed) करण्यात आला आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्‍ना मधुकर शेजवळ (Ratna Madhukar Shejwal) (५४,रा. फ्लॅट नंबर १३, सोहामणी सोसायटी, कामटवाडे शिवार, नाशिक ) यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी (दि. २ ते दि. ४) घरातील सोन्याची पोत (Gold texture) अंगठी (Ring) असा ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख (Bhagirath Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल बनतोडे (Atul Bantode) करत आहेत.

तर दुसर्‍या घटनेत प्रवीण पोपट गुंजाळ (Praveen Popat Gunjal) (३१,रा.रोहाऊस नंबर ९ ,साक्षी पार्क, मटाले कॉलनी, देवराम नगर, धन्वंतरी मेडिकल कॉलेजच्या पाठीमागे, कामटवाडे,अंबड, नाशिक) यांच्या राहत्या घरात (दि.४ ते दि.५ ) अज्ञात चोरट्याने घराच्या बाजूला असलेल्या जिन्याच्या साह्याने त्यांच्या टेरेसवर येऊन बेडरुमच्या उघड्या असलेल्या दरवाजा द्वारे आत प्रवेश करून बेडरूममधील लाकडी कपाटाच्या (Wooden cupboard) बाजूला असलेल्या चावीच्या सहाय्याने कपाट खोलून कपाटामध्ये असलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह (Gold silver jewelry) रोख रक्कम असा २ लाख २६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक देशमुख (Police Naik Deshmukh) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com