
सिन्नर । Sinnar
शहराजवळील मापारवाडी (Maparwadi) येथील श्रीकृष्णनगरमध्ये (Srikrishnanagar) घरफोडी (Burglary) करुन अज्ञात चोरट्यांनी लाखोंचे दागिने (Jewelry) लंपास केल्याची घटना घडली आहे....
याबाबत अधिक माहिती अशी की, सेवानिवृत्त शिक्षक असलेले रामराव केशव लोहार (६६ ) हे श्रीकृष्णनगरमध्ये राहतात. कामानिमित्त ते चार दिवस बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी (Unknown Thieves) संधी साधत त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
यावेळी चोरट्यांनी चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, अर्धा तोळे सोन्याच्या वाट्या, दोन ग्रॅमचे कानातले व २५ हजारांची रोख रक्कम घेऊन तेथून पोबारा केला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करत लोहार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Filed a case) केला आहे.