समितींचे दौरे, साध्य काही नाही, भुर्दड मात्र शासनाला
USER

समितींचे दौरे, साध्य काही नाही, भुर्दड मात्र शासनाला

पुनदखोरे । संदीप जगताप Dindori-Kalwan

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) प्रशासकीय विभागांचा आढावा (Review of administrative departments) घेण्यासाठी गेल्या दोन महीन्यांपासुन विविध समीतींचे दौरे येऊन गेलेल्या आढावा समित्यांच्या दौर्‍यांवर लाखो रुपये खर्च होत आहे. साध्य मात्र काहीच होत नसल्याने शासनास मात्र लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्याचे निर्दशनास आले आहे.

मागील दोन महीन्यापुर्वी जिल्हयासह कळवण तालुका (Kalwan Taluka) दौर्‍यावर आदिवासी विकास विभागाचे (Department of Tribal Development) योजना आढावा समिती प्रमुख विवेक पंडीत (Review Committee Head Vivek Pandit) यांचा दौरा झाला. त्यानंतर लागलीच अनुसूचित जमाती कल्याण समिती (Scheduled Tribes Welfare Committee) विधानमंडळ अध्यक्ष दौलत दरोडा यांचा तीन दिवशीय दौरा पार पडला.

नंतर पंचायत राज समिती (Panchayat Raj Samiti) आणि आता परत दि. 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यत आ. रणजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ अंदाज समितीचा (Legislative Estimates Committee) दौरा असे ऐका मागोमाग समितींचे दौरे नाशिक जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये होत आहे.

शासनाच्या समित्यांमध्ये प्रशासनाचे अधिकारी, सचिव तसेच आमदार असा 20 ते 30 पदाधिकार्‍यांचा ताफा असतो. या समित्यांमार्फत गत पाच वर्षात प्रत्येक शासकीय विभागाने कुठल्या योजनांची अंमलबजावणी केली. योजनानिहाय शासनाकडून कीती निधी (Fund) आला, खर्च कीती झाला, निधीचा वापर योग्य पद्धतीने झाला की नाही, खर्च झालेली कामे पुर्ण झाली की प्रगतीपथावर आहे.

शिल्लक निधी असल्यास त्या निधिचे काय केले अशी सर्वच माहितीचा आढावा घेऊन शासनास त्याचा अहवाल सादर करावा लागतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या अखरित्यातील असणार्‍या सर्वच प्रशासकीय विभागांची आवश्यक असलेल्या बाबींच्या टीपण्या तयार करण्यासाठी मोठी दमछाक होत असते.

ऐवढ असुन मागील समित्यांनी दौरे केले त्यांनी आढावा घेऊन अहवाल (Report) शासनास सादर सुद्धा केले असतील, पंरतू वेळोवेळी येणार्‍या आढावा समितीच्या दौर्‍यांवर शासनाचे लाखो रुपये खर्च होऊन मोठया प्रमाणात आर्थिक भुर्दड (Financial crisis) सोसावे लागत आहे. यात मात्र साध्य काहीच होत नसल्याने आढावा समित्यांचा नेमका अंजिठा काय आहे ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.

कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात (Kalvan Integrated Tribal Development Project) संगणक (Computer) खरेदी घोटाळ्यासह अनेक भ्रष्टाचार व घोटाळे (Corruption and scams) झाले आहे. याबाबत दोन महिन्यापुर्वी कळवण तालुका दौर्‍यावर आलेले आदिवासी विकास विभागाचे योजना आढावा प्रमुख विवेक पंडीत त्यानंतर 15 दिवसांपुर्वी आलेले अनुसूचित जमाती कल्याण समिती अध्यक्ष दौलत दरोडा आदींना कळवण तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने (Maharashtra State Marathi Press Association) आदीवासी प्रकल्पात सुरू असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात संबधितांवर कारवाई करण्यासाठी निवेदने देण्यात आली होती.

पंरतू त्यांनीही संबधित भ्रष्टाचांर्‍याची साधी चौकशी सुध्दा केली नसुन त्यांची पाठराखण केली असल्याचे समजले आहे. घोटाळेबाजांना भ्रष्टाचार (Corruption) करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. भ्रष्टाचार्‍यांची चौकशी का होत नाही. यात काय गौडबंगाळ आहे? सातत्याने सुरु असणारे आढावा समीतींचे दौरे फक्त प्रशासनातील विभागांची छान छान करण्यासाठीच आहेत का ? शासनाला लाखो रुपयांचे भुर्दड लावण्यासाठी आहे? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com