'या' बचतगटांना लाखोंचे कर्ज

'या' बचतगटांना लाखोंचे कर्ज
USER

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

येथील नगर परिषद (nagar parishad) कार्यालयात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (National Urban Livelihoods Campaign) अंतर्गत प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेतून (Pradhan Mantri Atmanirbhar Yojana) वैयक्तिक व बचत गटांना (Savings Groups) 42 लाखांचे कर्ज प्रस्ताव (Loan proposal) मंजूर करण्यात आले.

शहर प्रकल्प अधिकारी तथा मुख्याधिकारी संजय केदार (City Project Officer and Principal Sanjay Kedar) यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक विश्वनाथ चक्रवर्ती, बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक मंगेश कुलकर्णी, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक अमोल अमृतकर, शाखा व्यवस्थापक आशिष कुमार महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक सुरेश चौधरी, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक भूषण पाटील, उन्नती शहर स्तरीय संघाच्या अध्यक्षा निलोफर सय्यद यांचे प्रमुख उपस्थित बैठक झाली.

यावेळी स्वयंरोजगार (Self Employed) या घटकाच्याद्वारे कर्ज प्रस्ताव कागदपत्रांची तपासणी करण्यात आली व 18 वैयक्तिक उद्योग व्यवसाय करणार्‍या लाभार्थ्यांना 18 लक्ष रुपयेचे कर्ज मंजुरी (Loan approval) देण्यात आली. तसेच महिला स्वयंसहायता बचत गटाच्याद्वारे उद्योग व्यवसाय करणार्‍या 12 बचत गटांना 24 लक्ष रुपयेच बँक कर्ज मंजूर करण्यात आले.

कोरोना (corona) काळात हाताचा व्यवसाय बंद झालेल्या फेरीवाले यांस त्यांचा व्यवसाय पुन्हा चालू करता यावा यासाठी केंद्र शासनाने (central government) प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना (Pradhan Mantri Atmanirbhar Nidhi Yojana) आणली असून सदर योजने अंतर्गत प्रथम कर्ज, द्वितीय कर्ज व तृतीय कर्ज असे विना तारण कर्ज दिल्या जात आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त फेरीवाले बांधव यांनी लाभ घ्यावा. तसेच, प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत वैयक्तिक व बचत गटाचे कर्ज प्रस्ताव मंजूर करून सर्व बँक व्यवस्थापक यांनी लवकर कर्ज वितरित करावेत.

लाभार्थ्यांनी देखिल ज्या व्यवसायासाठी आपण कर्ज कर्ज घेतो आहोत त्याच व्यवसायासाठी सदर कर्ज रकमेचा उपयोग करावा व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करिता हातभार लावावा असे आवाहन शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी अनुराधा लोंढे, नीशा कापुरे, प्रतिभा भाटजिरे, यांच्यासह बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com