अन्न व औषध प्रशासनाकडून 'इतक्या' लाखाचा गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासनाकडून 'इतक्या' लाखाचा   गुटखा जप्त

नाशिक । Nashik

येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने (Food and Drug Administration Office) गुटखा (Gutkha) प्रतिबंधित अन्न पदार्थ तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थाविरुध्द कारवाई सुरु ठेवलेली असून त्या अंतर्गत जिल्ह्यात (District) विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार (दि २५) रोजी सिन्नर (Sinnar) येथे गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन यांनी लालचंद भानुदास बोडके (Lalchand Bhanudas Bodke) यांच्या गोदाम (गाळा नं. ११८, सरस्वती पुलाजवळ, नेहरू चौक, सिन्नर जि.नाशिक) येथे धाड (raid) टाकत तपासणी केली. या धाडीत महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात प्रतिबंधित असलेला केशरयुक्त पान मसाला (Pan masala) व्ही १ सुगंधीत तंबाखु, रजनीगंधा, आर.एम.डी., गोवा, हिरा पानमसाले व त्याच्यासमवेत विविध प्रकारच्या सुगंधीत तंबाखु अशा एकूण १७ प्रकारच्या प्रतिबंधीत अन्न पदार्थांसमवेत एकूण १ लाख २७ हजार ९४३ रुपये किमतीचा साठा सिन्नर शहरात विक्रीसाठी साठवणूक करतांना आढळून आला .

अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer) संदिप देवरे (Sandeep Deore) यांनी सदर प्रकरणी संपूर्ण साठा विक्रेता व मालक लालचंद भानुदास बोडके यांच्याकडून जप्त (confiscation) करुन गोदामास सिल केले. त्यानंतर देवरे यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त केलेला साठा हा कोणाकडून प्राप्त झाला याबाबत व सदर चोरटया व्यापारास प्रतिबंध व्हावा म्हणून याचा मुख्य सुत्रधार निष्पन्न करणेकामी व या प्रकरणाचा संपूर्ण उत्पादकापर्यंत तपास करणेकामी प्रथम खबरी अहवाल अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६, २७, ३, ३० व शिक्षापात्र कलम ५९ तसेच भा.द.वि. कलम १८८, २७२, २७३ व ३२८ अंतर्गत सिन्नर तालुका पोलीस ठाणे येथे दाखल केला आहे.

दरम्यान, ही कारवाई सहआयुक्त (अन्न) (Joint Commissioner Food) गणेश परळीकर (Ganesh Parlikar) तसेच सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे (Uday Lohkare) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी संदिप देवरे व वाहन चालक एन. के. साबळे यांनी केली. तसेच पुढील तपास सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Taluka Police Station) सुरु आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com