पथदीपांअभावी रेल्वे पुलावर अपघातांत वाढ

पथदीपांअभावी रेल्वे पुलावर अपघातांत वाढ

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Deolali Camp

देवळाली (Deolali) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Cantonment Board) हद्दीतील विजयनगर येथे भगूर (bhagur), विंचुरी-पांढुर्ली महामार्गावरील (Vinchuri-Pandhurli highway) रेल्वे उड्डाणपुलावर (Railway flyover) पथदीप (street lamp) बसविण्यात न आल्याने रात्रीच्या वेळी अंधार होतो.

त्यामुळे वाहनांचे छोटे मोठे अपघात (accidents) होत आहेत. शिवाय पुलाचे काम (bridge work) अपूर्ण असतांना उड्डाणपुलावर (flyover) वाहतूक सुरू झाल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचा आरोप शिवसेनेचे (shiv sena) भगूर शहरप्रमुख विक्रम सोनवणे यांनी केला असून रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) पंधरा दिवसात ही कामे पूर्ण करावी, अन्यथा आंदोलन (agitation) छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भगूर रेल्वे गेटजवळ उड्डाणपुलाची (flyover) निर्मिती करण्यात येऊन वाहतूक कोंडी (traffic jam) कमी करण्यात आली असली तरी अद्यापही उड्डाणपुलाचे अपूर्ण असल्याने त्याचा मोठा फटका वाहन चालकांना बसत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी भगूर-विंचुरी रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले. मात्र, अद्याप ते अपूर्ण अवस्थेतच असून उद्घाटनापूर्वीच रस्ता वाहतुकीस सुरू करण्यात आला.

मात्र वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही ठोस उपाययोजना नसल्याने हा पूल अपघाताला आमंत्रण देणारा आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित उड्डाणपुलावर (flyover) रेल्वेच्या लाइनजवळ संरक्षण जाळी बसविण्यात यावी, पुलाच्या सुरवातीला गतिरोधक बसविण्यात यावे, त्यावर पांढरे पट्टे मारण्यात यावे, पुलावर पथदीप बसविण्यात यावे, तसेच पुलाच्या सुरवातीस विद्यालय असून,

त्या ठिकाणी विद्यार्थी, नागरिक व वाहनधारकांसाठी सूचनाफलक लावण्यात यावा. नागमोडी पूल असल्याने वाहने समोरासमोर येऊन अपघात वाढत आहेत. या गतिरोधक बसविणे काळाची गरज आहे. प्रशासनाने सुधारणा न केल्यास होणार्‍या अपघातास रेल्वे प्रसासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

तीन तालुक्यांना जोडणारा हा पूल असल्याने सातत्याने वाहतुकीची वर्दळ असते. पुलावर खड्डे पडल्याने व पथदीप बंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याची संबंधित विभागाने दक्षता घेऊन कार्यवाही करावी.

- विक्रम सोनावणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com