खरड छाटणीला मजूर टंचाईचे ग्रहण

खरड छाटणीला मजूर टंचाईचे ग्रहण

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirwade Wani

येथील परिसरात द्राक्षाच्या (Grapes) एप्रिल तथा खरड छाटणीस प्रारंभ झाला असून द्राक्ष काढणीचा अंतिम टप्पा तसेच ओझरखेड कालव्याला (Ozarkhed canal) नुकतेच सुटलेले पाणी यामुळे खरड छाटणी लवकर उरकून घेण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची (Grape growers) धांदल उडाली असून कांदे (onion) व गहू काढणे आदी कामांमुळे मजुरांची टंचाई (Labor shortage) भासत आहे.

मागील दोन वर्षा च्या कालखंडाकडे दृष्टीक्षेप टाकला असता करोना (corona) पार्श्वभूमीवर द्राक्ष पिकाला (Grape Crop) जरी जेमतेम भाव मिळाला असला तरी यावर्षी देखील बाजारभावावर करोनाचे पडसाद उमटले. द्राक्षाला योग्य भाव न मिळाल्यामुळे हा हंगाम देखील काहीसा नरम गरम गेला. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपले लक्ष भाजीपाला पिकाकडे (Vegetable crop) केंद्रीत केले. यावर्षी खरीप हंगामातील (kharip season) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्ष पिकासाठी कंबर कसली पण भाव मिळाला नाही. अवकाळी पावसात अनेक द्राक्षबागा (Vineyard) उद्धवस्त झाल्या.

अनेक शेतकर्‍यांनी (farmers) द्राक्ष बागा सोडून दिल्या. यापैकी काही बागा वादळी वार्‍यात भुईसपाट झाल्या. परतीच्या पावसाने द्राक्षमण्यांना तडे गेले. त्यामुळे 70 टक्के द्राक्षबागांचे नुकसान झाले. त्यात निसर्गाचा असमतोल आणि बाजार भावातील चढ-उतार, बदलते हवामान, व्यापारी पलायन यामुळे द्राक्ष पीक बेभरवश्याचे झाले आहे.

दरवर्षी द्राक्ष हंगामासाठी गुजरात (gujrat), पेठ (peth), सुरगाणा (surgana) परिसरातून मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आणले जातात. द्राक्ष काढणीपर्यंत मजुरांची गरज भासते. त्यातच मागील वर्षी खरड छाटणी उशीरा झाल्यामुळे द्राक्ष वेलीवर मालकाड्या परिपक्व न झाल्याने त्याचा फटका काही शेतकर्‍यांना नक्कीच बसला असून द्राक्षवेली सशक्त होण्यासाठी तसेच द्राक्षाच्या खरड छाटणी नंतर द्राक्षवेली मधून परिपक्व घड निघण्यासाठी खरड छाटणीचा अवलंब केला जातो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com