मजूर फेडरेशन चेअरमनपदी भाबड, व्हा. चेअरमनपदी शर्मिला कुशारे विजयी

मजूर फेडरेशन चेअरमनपदी भाबड, व्हा. चेअरमनपदी शर्मिला कुशारे विजयी

नाशिक | Nashik

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या (Nashik District Labor Federation) चेअरमनपदी आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांचे समर्थक प्रमोद भाबड (Pramod Bhabad) (नांदगाव) यांची तर व्हा.चेअरमनपदी शर्मिला कुशारे (Sharmila Kushare)(नाशिक) यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत राजेंद्र भोसले यांच्या गटाला आमदार कांदे यांचे पाठबळ मिळाल्याने भोसले गटाची सरशी झाल्याचे पाहायला मिळाले.

चेअरमन पदासाठी भोसले गटाकडून भाबड तर संपतराव सकाळे (Sampatrao Sakale) गटाकडून ज्ञानेश्वर लहाने यांनी अर्ज दाखल केला होता. तर व्हा. चेअरमन पदासाठी भोसले गटाकडून शर्मिला कुशारे तर सकाळे यांच्या गटाकडून सुरेश भोये यांनी अर्ज दाखल केला होता. यावेळी झालेल्या गुप्त मतदानामध्ये चेअरमन पदासाठी निवडणूकीत उतरलेले भाबड यांना १२ तर ज्ञानेश्वर लहाने यांना आठ मते मिळाली. यात भाबड यांचा चार मतांनी विजयी झाला.

तसेच व्हा. चेअरमन पदासाठी भोसले गटाकडून शर्मिला कुशारे तर सकाळे गटाकडून सुरेश भोये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.कुशारे यांना १२ तर भोये यांना आठ मते मिळाली.कुशारे चार मतांनी विजयी झाल्या.नवनिर्वाचित चेअरमन भाबड व व्हा.चेअरमन कुशारे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश गिरी महंत (Suresh Giri Mahant) यांनी जाहीर केले. यानंतर नवनिर्वाचित चेअरमन व व्हायचेअरमन यांच्या निवडीचे सर्वांनी स्वागत केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com