'लॅब डोअर' संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरेल : पालकमंत्री छगन भुजबळ

या संकेतस्थळावर नोंदणी करा
छगन भुजबळ
छगन भुजबळ digi

नाशिक । Nashik

नाशिकच्या युवकांनी पुढे येऊन सुरू केलेली ‘घरपोच पॅथलॅब’ संकल्पना करोना संकटाच्या काळात नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

लॅब डोअर या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे पालकमंत्री भुजबळ यांनी भुजबळ फार्म येथून रविवारी (दि.१२) ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मराठा उद्योजक लॉबीचे संचालक चिंतेश्वर देवरे, डॉ.मंजुश्री घाटी, मच्छिंद्र शेलार, प्रवीण पवार, संतोष जायभावे संचालक राहुल निकम व अजय शेलार यावेळी ऑनलाईन उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, राहुल निकम व अजय शेलार या दोन युवकांनी एकत्र येऊन मुंबई व दिल्ली नंतर नाशिक मध्ये प्रथमच अशा संकल्पनेला सुरुवात केली आहे.

नाशिक शहर व परिसरातील नागरिकांसाठी संकेतस्थळ माध्यमातून घरपोच पॅथलॅब सुविधा मिळाव्यात यासाठी सदर संकल्पनेला सुरुवात केली आहे. हे तरुण सकाळी ६ वाजेपासून सॅम्पल गोळा करण्यास सुरुवात करणार असल्याने सर्वसामान्यांना याचा अधिक फायदा होईल. तसेच या चाचणीचा अहवाल त्या रुग्णाला त्याच्या घरी ईमेल तसेच व्हाट्सएपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी दरही कमी ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा मिळेल आणि ज्यांत लक्षण जाणवत नाही अशा काही आजारांचे देखील निदान या चाचणी अहवालातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना या चाचण्या मार्गदर्शक म्हणून काम करतील. www.arlabdoors.com या संकेतस्थळावर नोंदणी करून घरपोच सेवा मिळवून आपल्या आरोग्यासंदर्भात असलेल्या सर्व चाचण्या करवून घेण्याचे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com