दावचवाडी सोसायटी चेअरमनपदी कुयटे

दावचवाडी सोसायटी चेअरमनपदी कुयटे

पालखेड मिरचीचे । वार्ताहर | Palkhed Mirchiche

दावचवाडी विकास सोसायटी (Davachwadi Development Society) चेअरमनपदी अर्जुन नारायण कुयटे (Arjun Narayan Kuate as Chairman) यांची तर व्हा.चेअरमनपदी प्रभाकर दगु शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

दावचवाडी सोसायटीच्या संचालक मंडळाची (Board of Directors of Davachwadi Society) पंचवार्षिंक निवडणूक (election) बिनविरोध पार पडल्यानंतर चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीसाठी संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी राजीव इप्पर (Returning Officer Rajiv Ippar) (सहकार अधिकारी पेठ), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एम. कोटकर (Assistant Returning Officer V.M. Kotkar) यांचे उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली असता चेअरमन पदासाठी अर्जुन नारायण कुयटे यांनी अर्ज दाखल करून त्यावर सूचक म्हणुन प्रभाकर दौलत कुयटे यांनी सही केली होती. तर व्हा. चेअरमन पदासाठी प्रभाकर दगू शिंदे यांनी अर्ज दाखल करून त्यावर सूचक म्हणुन सुरेश रंगनाथ शिंदे यांनी सही केली होती.

दिलेल्या मुदतीत वरील दोन पदांसाठी दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहिर केले. याप्रसंगी संचालक प्रभाकर दौलत कुयटे, भास्कर सखाराम कुयटे, विठोबा कारभारी कुयटे, संजय वसंत कुयटे, भाऊसाहेब माधव मोरे, सुरेश रंगनाथ शिंदे, कौशाबाई परसराम कुयटे, मंदाकिनी मधुकर कुयटे, सुदाम छबु कुयटे, नामदेव रघुनाथ शिंदे, एकनाथ मल्हारी आहिरे आदींसह एकनाथ कुयटे, संपत कुयटे, बबन कुयटे, मनोज कुयटे,

गणेश कुयटे, शंकर कुयटे, देविदास कुयटे, प्रकाश कुयटे, योगेश कुयटे, दीपक शिंदे, गणपत मोरे, आप्पा मोरे, गणेश शिंदे, गणपत कुयटे, बाळासाहेब हांडगे आदींसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीनंतर त्यांचे समर्थकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे माजी आमदार अनिल कदम, ज्येष्ठ नेते भास्कर बनकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

संस्था हिताला प्राधान्य दावचवाडी परिसरात नावलौकीक प्राप्त केलेल्या या संस्थेची ओळख आहे. सभासदांना वाटप केलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सभासदांनी प्रयत्न केले पाहिजे. सर्व संचालक व सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत सर्वांना बरोबर घेऊन संस्थेचे कामकाज केले जाईल.

अर्जुन कुयटे, सभापती दावचवाडी सोसायटी

Related Stories

No stories found.