सायखेडा श्रीराम सोसायटी चेअरमनपदी कुटे

सायखेडा श्रीराम सोसायटी चेअरमनपदी कुटे

निफाड। प्रतिनिधी | Niphad

गोदाकाठची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सायखेडा (Saykheda) येथील श्रीराम विकास सह. सोसायटीच्या चेअरमनपदी जगन्नाथ भिमाजी कुटे (Shriram Vikas co. Jagannath Bhimaji Kute as the Chairman of the Society) यांची तर व्हा. चेअरमनपदी दुर्गाबाई नामदेव कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सायखेडा श्रीराम सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीसाठी निवडणूक (election) निर्णय अधिकारी अशोक काकड, सोसायटी सचिव कदम यांचे उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली असता चेअरमनपदासाठी जगन्नाथ भिमाजी कुटे यांनी अर्ज दाखल करून त्यावर सूचक म्हणून घनशाम जोंधळे यांनी सही केली होती. तर व्हा. चेअरमनपदासाठी दुर्गाबाई नामदेव कुटे यांनी अर्ज दाखल करून त्यावर चंद्रकांत कारभारी उगले यांनी सही केली होती. दिलेल्या मुदतीत वरील दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.

याप्रसंगी हर्षदा कुटे, निता कुटे, प्रमोद कुटे, रोहित कुटे, चंद्रकांत उगले, मनोज नारायणे, शाम जोंधळे, शुभम कुटे, सुनीता कुटे, उल्हास कुटे, कैलास सोनवणे आदी संचालकांसह विजय कारे, संदीप कुटे, सिंधू कुटे, यशोदा कुटे, दिलीप शिंदे, मनोज भुतडा, राजू कुटे, पोपट घुगे, सुधीर देशमानकर, शरद कुटे, जितू कुटे, संजय कुटे, प्रसाद कुटे, सोमनाथ कुटे, भाऊलाल कुटे, सुनील कुटे आदींसह सोसायटी सभासद उपस्थित होते. या निवडीनंतर त्यांचे समर्थकांनी फटाक्याच्या आतिषबाजीत गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी मित्र परिवार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोसायटी सभागृहात चेअरमन जगन्नाथ कुटे, व्हा.चेअरमन दुर्गाबाई कुटे यांचा सोसायटी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आल

सभासद हिताला प्राधान्य सोसायटी संचालक, सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जावू न देता सर्वांना बरोबर घेवून सोसायटीत कामकाज केले जाईल. यासाठी वेळप्रसंगी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतले जाईल. सभासद, कर्मचार्‍यांचे हित जोपासण्याबरोबरच सोसायटीला नावलौकीक मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. शेतकर्‍यांची कर्ज प्रकरणे तत्पर व्हावी तसेच थकित वसुली होण्याकडे विशेष लक्ष पुरविले जाईल.

- जगन्नाथ कुटे, नवनिर्वाचित चेअरमन

Related Stories

No stories found.