नामपूर सभापती पदी कृष्णा भामरे

नामपूर सभापती पदी कृष्णा भामरे

पिंगळवाडे | संदीप गांगुर्डे | Pingalwade

नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Nampur Agricultural Produce Market Committee) सभापती (Speaker) पदी कृष्णा धर्मा भामरे (Krishna Dharma Bhamre) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आवर्तन पद्धतीने नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती शांताराम निकम यांनी राजीनामा (Resigned) दिल्याने सर्व संचालक मंडळ यांच्या एक मुखाने कृष्णा भामरे यांचे नाव घोषित करण्यात आले. या प्रसंगी निवडणूक (election) अधिकारी म्हणून साळुंखे यांनी आपले कर्तव्य बजावले. तसेच याप्रसंगी सूचक भाऊसाहेब अहिरे, संजय भामरे. भाऊसाहेब भामरे भावा अहिरे, हे उपस्थित होते. व सर्व संचालक मंडळाने आभार प्रदर्शन व सत्कार केला.

यावेळी कृष्णा भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पिंगळवाडे या गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अश्वारूढ पुतळ्याळा कृष्णा भामरे यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच गावातील तरुणांनीव ग्रामस्थांनी बॅंड पथकावर जल्लोष साजरा केला. या वेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.

गावातील मान्यवरांनी कृष्णा भामरे यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. व कृष्णा भामरे यांचा सत्कार समारंभ पार पडला भामरे यांच्या निवडीने पिंगळवाडे गावात आनंदमय वातावरण होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com