‘कृषीथॉन’ला आजपासून सुरुवात

कृषी उद्योग-व्यवसायिकांसाठी पर्वणी
‘कृषीथॉन’ला आजपासून सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आधुनिक तंत्रज्ञान युगात कृषी क्षेत्रात मोठया प्रमाणात बदल होत आहेत. शेतीमध्ये उत्पादनाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे निर्माण केले जात आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना माहिती मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व 'मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृषीथॉन’ ( Krishithon-2022)प्रदर्शनाला आजपासून (दि.24) सुरूवात होत आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.

प्रदर्शनाच्या पंधराव्या आवृत्तीचा शुभारंभ उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, देवीदास पिंगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञानावर आधारित 300 हून अधिक कंपन्यांचा सहभाग असल्याने शेतकरी व कृषीवर आधारित उद्योग - व्यवसायिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. ड्रोन, विविध अ‍ॅप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निविष्ठा संस्था, कंपन्यांनी घेतलेला सहभाग यंदाच्या कृषीथॉनचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

यंदाचे आकर्षण

24 नोव्हेंबर : कृषीथॉन उद्घाटन सोहळा, प्रश्न दूध उत्पादकांचे-मार्गदर्शन तज्ज्ञांचे.

25 नोव्हेंबर : कृषीथॉन युवा सन्मान, प्रश्न द्राक्ष उत्पादकांचे-मार्गदर्शन तज्ज्ञांचे.

26 नोव्हेंबर : कृषीउद्योग परिसंवाद व आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्कार वितरण, प्रश्न कांदा-टोमॅटो उत्पादकांचे मार्गदर्शन तज्ज्ञांचे.

27 नोव्हेंबर : कृषी क्षेत्रातील महिलांचा सन्मान - प्रश्न डाळिंब उत्पादकांचे-मार्गदर्शन तज्ज्ञांचे.

28 नोव्हेंबर : कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com