जय किसान फार्मर्स फोरमचे 'कृषीरत्न' पुरस्कार जाहीर

जय किसान फार्मर्स फोरमचे 'कृषीरत्न' पुरस्कार  जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जय किसान फार्मर्स फोरम Jai Kisan Farmers Forum व आमची माती आमची माणसं कृषी मासिकातर्फे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त (Dr. Punjabrao Deshmukh Jayanti )देण्यात येणारे "कृषीरत्न" ( Krishiratna Award ) हे प्रेरणा पुरस्कार राज्यातील ४० शेतकरी-कृषी उद्योजकांना जाहीर झाले आहेत.

दि. २७ डिसेंबरला नाशिक येथील प. सा. नाट्यगृहात सकाळी ११ वाजता पद्मश्री राहीबाई पोपेरे,खा.सुजय विखे पाटील आदींच्या हस्ते सपत्निक सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय जाधव यांनी दिली.

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये अर्जुन तोरवणे(महिंदळे,धुळे), माधव खैरे(हरसूल,नाशिक), बाळासाहेब घोरपडे(पोगरवाडी,सातारा), गोरख पाटील (गांगवण,कळवण,नाशिक), ज्ञानदेव कोरडे(सिंगापुर,पुरंदर,पुणे), ज्ञानेश्वर पवार (अमरवेल,धुळे), निखिल शिंदे (देवरगाव,नाशिक), नितीन झगडे(बारामती), सुवर्णा जगताप(लासलगाव), शिवराज मेटकर (म्हसला,अमरावती),

नामदेव शिंदे (वनसगाव,निफाड), रामदास खराडे(नगोरली,सोलापूर), संजय गावंडे(सावळी,बुलढाणा), भिकन देवरे(ओतूर,कळवण,), दिनेश दळवी(चिपळूण, रत्नागिरी), धनंजय बोरसे (कळवण,नाशिक), ऋषिराज पाटील (माजगाव,सातारा), दुल्लभ जाधव(जैताणे,धुळे), जगन्नाथ माळी(देवळा,नाशिक), शशिकांत तोरडमल(कर्जत,अहमदनगर), ज्ञानेश्वर सणस (निरावागज,पुणे), शांताराम कमानकर(निफाड,नाशिक), स्वप्निल सुर्यवंशी(हेळगाव,कराड), रविंद्र वाबळे(उगाव,नाशिक), अशोक देशमुख (संगमनेर,अहमदनगर),

तानाजी देवरे(बागलाण,नाशिक), डॉ. नितीन बाबर (चोपडी,सोलापूर), आण्णासाहेब गांगुर्डे(तीसगांव,नाशिक), दिनेश सोळूंके( अजंदे,मालेगांव,), दादाजी जाधव(पिळकोस,नाशिक), एकनाथ केदारे(वनसगाव,ता.निफाड), संदीप उफाडे(नाशिक), निमसे पाटील अ़ॅग्रो(श्रीरामपूर,अहमदनगर), श्रीमंत समृद्धी अ़ॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लि.(वैजापूर औरंगाबाद), उत्कर्ष अ़ॅग्रो प्लस इको फार्म प्रा. लि. (जत, सांगली), लोहकणे पाटील अ़ॅग्रो प्रोड्यूसर कं.लि.( डोणगाव,औरंगाबाद), शामराव सुरेश पगार(खेडगाव,दिंडोरी,), स्वप्निल रकिबे(धोडांबे,नाशिक), महेश माधव वाघ(जोपूळ,नाशिक), डॉ.सुनिल मोरे(चांदवड,)यांचा समावेश आहे.

मेडल,ट्राफी,फेटा,पैठणी साडी,सन्मानपत्र,डॉ.पंजाबराव देशमुख गौरव विशेषांक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com