नाशकात कोयता गँगची दहशत; बहीण-भावावर हल्ला

नाशकात कोयता गँगची दहशत; बहीण-भावावर हल्ला

नाशिक | Nashik

पुणे आणि अहमदनगरमध्ये (Pune and Ahmednagar) कोयता गँगचे ( Koyta Gang) मोठे लोण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यानंतर आता नाशिकमध्ये (Nashik) देखील कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली असून बहिण-भावावर हल्ला केल्याची घटना घडली आहे...

नाशकात कोयता गँगची दहशत; बहीण-भावावर हल्ला
'वंदे भारत एक्स्प्रेस'ने मुंबई-शिर्डी प्रवास करताय? 'असे' आहेत तिकीट दर

याबाबत अधिक माहिती अशी की, बहिणीची (Sister) छेड (Teasing) काढण्याचा जाब विचारायला गेलेल्या भावावर कोयता गँगने हल्ला (Attack) केला. यासोबतच बहिणीच्या हातावरही वार करण्यात आले असून या हल्ल्यात बहीण भाऊ दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तसेच जखमी झालेल्या दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच या प्रकरणातील संबधित आरोपी फरार झाले असून पोलीस पुढील तपास करत आहे. तसेच नाशिकमध्ये कोयता गँगने डोकं वर काढल्याने खळबळ उडाली आहे.

नाशकात कोयता गँगची दहशत; बहीण-भावावर हल्ला
सुप्यात कोयता गँगची दहशत; एकावर कोयत्याचे वार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com