कोटंबी घाट पुन्हा बंद; शेकडो वाहने खोळंबली

कोटंबी घाट पुन्हा बंद; शेकडो वाहने खोळंबली

पेठ | प्रतिनिधी | Peth

येथील कोटंबी घाटामधील ( Kotambi Ghat) यु टर्नवर बुधवार (दि.१६) रोजी ऑईल टँकर (Oil Tanker) पलटी झाल्याने वळणावर सर्वत्र ऑईल वाहत असून रस्त्यावरून (Road) वाहने घसरत असल्याने घाट बंद पडला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, ऑईल टँकर पलटी झाल्यानंतर त्यावर माती टाकून वाहने सुरु करण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून करण्यात आला. मात्र गुजरातकडे (Gujrat) जाणारी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढत असतांनाच आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास टीएन ५२ डब्ल्यू १८५२ क्रमाकांचा ट्रक रस्त्यातच उलटल्याने पुन्हा वाहतुक बंद (Traffic Stop) पडली आहे.

दरम्यान, चार तासाचा कालावधी जाऊनही या प्रकाराकडे लक्ष देण्यास कुणास फुर्सत नसल्याने रस्त्यावर शेकडो वाहने (Vehicles) अडकून पडली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com