कोकणे हल्ला प्रकरण: तपासाधिकारी मोहितेंना त्वरित निलंबित करा

शिवसेनेचे पोलिस आयुक्तांना निवेदन
कोकणे हल्ला प्रकरण: तपासाधिकारी मोहितेंना त्वरित निलंबित करा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेनेचे (shiv sena) पदाधिकारी बाळासाहेब कोकणे (Balasaheb Kokne) यांच्यावर हल्ला झाला त्या प्रकरणातील तापासाधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते (Investigation officer Assistant Police Inspector Dyaneshwar Mohite) यांच्यावर निलंबनाची कार्यवाही (Suspension proceedings) करण्यात यावी

अशी मागणी करणारे निवेदन (memorandum) शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Shiv Sena Metropolitan Chief Sudhakar Badgujar) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Commissioner of Police Jayant Naiknavare) यांना देण्यात आले.

बाळासाहेब कोकणे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने रेडक्रॉस सिग्नलजवळ (Red Cross Signal) भ्याड हल्ला झाला होता. त्यात कोकणेंना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर सिद्धिविनायक इस्पितळात उपचार सुरूअसतांना 18 जुलै 2022 रोजी त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात (Bhadrakali Police Station) रितसर गुन्हा दाखल झाला असतांनाही आरोपींना पकडण्यात तापासाधिकारी मोहिते यांनी कोणतीच तत्परता दाखवली नाही असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

सीडीआर रिपोर्टनुसार (CDR report) गुन्हेगारांच्या पाठीशी असलेल्यांनासुद्धा सहआरोपी करण्यात आलेले नाही. सुजित जीरापुरे, योगेश म्हस्के, जेरी डेव्हिड यांनी या हल्ल्याची सुपारी दिली असल्याचे आमचे म्हणणे असतांनासुद्धा केवळ ते शिंदे गटाशी संबंधित असल्याने पोलिसांनी सीडीआर रिपोर्टनुसार त्यांच्यावर कारवाई केलेली नाही असा आमचा आरोप या निवेदनात (memorandum) करण्यात आलेला आहे.

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पंचनामे करतांना शासकीय पंच घेणे गरजेचे असताना तपासाधिकारी यांनी तसे केले नाही. मात्र 30 जुलै आणि 1 ऑगस्टरोजी जीवन दिघोळे हा पंच घेतला जो आरोपी सागर दिघोळेचा सख्खा भाऊ आहे. तसेच दुसरा पंच आस्पाक रंगरेज याचेही आरोपीशी चांगले संबंध आहेत. प्रमोद वंजारी हा पंचसुद्धा आरोपीचा नातेवाईक आहे. करण राजपूत हा पंच आरोपी सुरज राजपूतचा सख्खा भाऊ आहे.

गुन्ह्यातील आरोपींना सोडविण्यासाठीच शासकीय पंच न घेता आरोपींचे नातेवाईकच पंच म्हणून घेण्याची तपासाधिकार्‍यांची कृती म्हणजे न्यायालयाचे एक प्रकारे उल्लंघनच आहे.त्यामुळे तपास अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्यावर त्वरित निलंबनाची कार्यवाही करावी याबाबत लवकर निर्णय न झाल्यास आम्हाला पोलिस महासंचालकांकडे दाद मागावी लागेल तसेच पोलिस अधिकारी मोहितेंविरुद्ध न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करावी लागेल, असा इशाराही निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.

शिष्टमंडाळात मनपा माजी गटनेते विलास शिंदे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, सुभाष गायधनी, माजी महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, उपमहानगरप्रमुख नाना पाटील, शहर संघटक वीरेंद्र टिळे, माजी महानगर संघटक राहुल दराडे, विभागप्रमुग संजय परदेशी, राजेश साळुंखे, शंतनू दिंडे आदींचा समावेश होता. मला नैसर्गिक न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. परंतु आरोपी गुन्हेगाराचे सख्खे भाऊ पंच म्हणून घेतल्याने मला नैसर्गिक न्याय कसा मिळेल याचा पोलिस आयुक्तानी खुलासा करावा. योग्य न्याय न मिळाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून उच्च यंत्रणांकडे व उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल.

- बाळासाहेब कोकणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com