कोल्हापूर-मनमाड किसान पार्सल ट्रेन

कोल्हापूर-मनमाड किसान पार्सल ट्रेन

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मध्य रेल्वेने कोल्हापुर-दौंड - मनमाड येथून विशेष किसान पार्सल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील पहिली किसान पार्सल ट्रेन नुकतीच देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान सुरु झाली. त्या गाडीशी ही गाडी लिंक केली जाईल.

कोल्हापुर-मनमाड लिंक विशेष किसान पार्सल गाड़ी कोल्हापुरहून २१ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी सकाळी 0५.३० वाजता सुटेल. त्याच दिवशी १८.२५ वाजता मनमाडला पोहोचेल.

अप मनमाड-कोल्हापुर लिंक विशेष किसान पार्सल गाड़ी मनमाडहून २३ आगस्ट ते २८ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक सोमवी २०.00 वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी कोल्हापुरला पोहोचेल.

या गाडीला मिरज, सांगोला,पंढरपूर, कुर्दुवाडी, दौंड, नगर, मनमाड नंतर देवळाली मुजफ्फरपूर- किसान पार्सल गाडीप्रमाणेच थांबे असतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com