गावागावात ज्ञान मंदिरे उभारावीत आ. कोकाटे

गावागावात ज्ञान मंदिरे उभारावीत आ. कोकाटे

पाथरेत विविध विकासकामांचे भुमिपुजन

पाथरे । वार्ताहर Pathre-Sinnar

बदलत्या काळानुसार ग्रामीण भागातील मुलांना जीवनात यशस्वी होण्यासाठी परंपरागत मंदिराप्रमाणेच ज्ञान मंदिरेही (dnyan mandir) उभारली पाहिजेत. आजच्या उदयोन्मुख पिढीसाठी गावा-गावात वाचनालय (library) आणि अभ्यासिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असल्याचे प्रतिपादन आमदार माणिकराव कोकाटे (mla Manikrao kokate) यांनी केले.

येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन (bhumipujan) केल्यानंतर आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (nationalist congress) तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र घुमरे, गटनेते विजय गडाख, नवनाथ नरोडे, वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर, कोसाकाचे माजी संचालक सर्जेराव कोकाटे, संपत चिने,

आनंदा कांदळकर, सुधाकर शिंदे, संभाजी जाधव उपस्थित होते. युवकांनीही पुढे येऊन चांगले शिक्षण घेत गावाचे, तालुक्याचे नाव उज्वल करावेे. स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला ज्ञानाची गरज असून यासाठी गावागावात अभ्यासिका उभारण्याची गरज बनली आहे. त्यामुळे गावांनीही यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी ते म्हणाले.

पाथरे बु. सरपंच सुजाता नरोडे, वारेगाव सरपंच मंदाकिनी दवंगे, विष्णू बेंडकुळे, चंद्रकांत चिने, शिवाजी दवंगे यांनी स्थानिक पातळीवरील पाणी व विजेच्या समस्या मांडल्या. विजेचा पुरवठा (power supply) सुरळीत दाबाने व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गडाख, वाघ यांनी तालुक्यातील विकास कामांचा संक्षिप्त आढावा घेतला. सूत्रसंचलन माजी सरपंच मच्छिंद्र चीने यांनी केले. आभार सरपंच नरोडे यांनी मानले.

या कामांचे भुमिपुजन

गावातील अभ्यासिका इमारत, ग्रीन जिम (Green Gym), पाथरे ते मिरगाव रस्ता दुरुस्ती (Road repair) व डांबरीकरण (Asphalting), पाथरे-वारेगाव-सायाळे रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण, पाथरे बुद्रुक-गायकर वस्ती-चिने वस्ती -रानमळा रस्ता दुरुस्ती, पाथरे खुर्द-चिने वस्ती-शिव रस्ता मजबुतीकरण.

Related Stories

No stories found.