लासलगाव l Lasalgaon

फिर्यादी नामे ब्रम्हणचारी पांडुचारी अवसली रा यल्लमागुडा, वडेपल्ली, ता. हातनुरा, जि. संगारेडडी, राज्य तेलंगाणा हे दि. २४ रोजी नाशिक औरंगाबाद प्रमुख राज्य मार्ग क्र. ०२ विंचुर गावाजवळ ता. निफाड येथे रात्री 10.30 वा.चे सुमारास त्यांच्या कंपनीचे कामानिमित्ताने वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी येथे मारुती सुझुकी स्विफट कार क्र. AP 35 TV 4745 हिचे चालक आनंद अबय्या चंदुर, रा. बोधन, ता. बोधन, जि. निजामाबाद, राज्य तेलंगाणा यांचे सोबत येत असताना त्यांचे मागुन आलेल्या पल्सर मोटार सायकल वरील तिघा लोकांनी गाडीचे चालकास गाडी थांबविण्यासाठी सांगितली.

परंतु चालक गाडी थांबवत नसल्याने त्यांनी ड्रायव्हर साईडकडील काचेवर हात मारु लागले. त्यावेळी चालकाने गाडी हळु करुन काच खाली घेतली असता मोटार सायकलवरील लोकांनी यातील फिर्यादी व चालक यांना बोलले की तुम्ही अपघात करुन पळुन आले. अशी खोटी बतावणी करुन गाडीला आडवी पल्सर उभी करुन यातील फिर्यादी व चालकास चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील तीस हजार रुपये किंमतीचा वन प्लस 6T कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट व दहा हजार रुपये किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट व एक पॉकेट त्यामध्ये रोख रुपये एक हजार व चालक आनंद याचे आधारकार्ड व मतदानकार्ड असे एकुण एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल व रोख रक्क्म बळजबरीने घेवुन फिर्यादीस व गाडी चालक यांचा रस्ता आडवुन लाथाबुक्यांनी मारहाण केली म्हणुन लासलगाव पोलीस स्टेशनला भादवि 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन

पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व सोमनाथ तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी, निफाड यांनी केलेल्या सुचनाप्रमाणे फिर्यादी व साक्षीदार यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे यातील संशयीत इमसांचा शोध घेण्यासाठी सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकष्ण सोनवणे व पोलीस अंमलदार उदयसिंग मोहारे, पोना राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास महाजन, प्रदिप आजगे, कैलास मानकर, संजय देशमुख यांचे पथक तयार करुन सदर पथक यातील संशयीत इसमांचा शोध घेत असता येवला रोड भरवस फाटा ता. निफाड येथे तीन इसम संशयीत रित्या हालचाल करतांना दिसले.

सदर इसमांकडे विचारपुस करता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने त्यांचे संशय आल्याने त्यांना पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्यांच अंगझडती करता वरील मोबाईल व पैस मिळुन आले. त्यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1) गोरखनाथ माधव झाल्टे, वय 32 वर्ष, रा. वाकदर्डी, ता. चांदवड, जि. नाशिक, 2) रावसाहेब रघुनाथ चव्हाण ,वय 29 वर्ष, रा. राजीव गांधी नगर, जोशीवाडा, कोर्टाचे मागे, ता.निफाड, जि. नाशिक, 3) युवराज शिवाजी पवार, वय 24 वर्ष, रा. राजीव गांधी नगर, जोशीवाडा, कोर्टाचे मागे, निफाड, ता.निफाड, जि. नाशिक असे सांगितले.

सदर आरोपींकडुन पल्सर मोटार सायकल व धारदार हत्यार तसेच इतर मोबाईल असा एकुण १ लाख 34,500चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी कडुन इतर पोलीस स्टेशनकडील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.