के के वाघच्या विद्यार्थिनींची पुणे विद्यापीठाच्या क्रिकेट संघात निवड

के के वाघच्या विद्यार्थिनींची पुणे विद्यापीठाच्या क्रिकेट संघात निवड

नाशिक । Nashik

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेकरीता (All India Inter University Cricket Tournament) के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (KK Wagh College of Engineering) दोन खेळाडू विद्यार्थीनिंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) क्रिकेट संघात निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या एमबीए विभागातील प्रियंका घोडके (Priyanka Ghodke) व सिव्हिल विभागातील तेजस्विनी बट्वल (Tejaswini Batwal) अशी या दोन खेळाडू विद्यार्थिनींची नावे आहेत....

गेल्या आठवड्यात जयपूर (Jaipur) येथे आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा पार पडली यात पुणे विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व प्रियंका घोडके हिने केले तर तेजस्विनी बट्वल हिने संघात यष्टीरक्षक म्हणून मोलाची भूमिका बजावली. नक्कीच या कामगिरीने के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तसेच नाशिक जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल झाले. परिणामी महाविद्यालयातील व जिल्ह्यातील क्रिकेट खेळात करिअर करु पाहणा-या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर (Principal Dr. Keshav Nandurkar) यांनी व्यक्त केले.

तसेच आगामी काळात दोन्हीही खेळाडू त्यांची निवड सार्थ ठरवून अभिमानास्पद कामगिरी करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवतील,असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ (Sameer Wagh) यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. के एस. बंदी (K.S.bandi) यांनी विद्यार्थिनींना आगामी स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या. तर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व जिमखाना विभाग प्रमुख प्रा.तानाजी कांडेकर (Tanaji Kandekar) यांनी या खेळाडू विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com