किसान सभेचा तहसीलवर मोर्चा; राज्य सरकारच्या धोरणाविरूध्द निदर्शने

किसान सभेचा तहसीलवर मोर्चा; राज्य सरकारच्या धोरणाविरूध्द निदर्शने

भालुर । वार्ताहर | Bhalur | Malegaon

वनजमीनी कसत असलेल्यांच्या नावे सातबारा करण्यात यावा तसेच गायरान जमीनीवरील अतिक्रमणे (Encroachment) कायम करावीत

या प्रमुख मागण्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमानकारक भाषा बोलणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना पदावरून त्वरीत हटविण्यात यावे आदी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी भारतीय कम्युनिष्ट पक्ष (Communist Party of India) व किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने तहसील कार्यालयावर (Tehsil Office) धडक मोर्चा काढण्यात येवून निदर्शने केली गेली.

गायरान जमीनीवरील अतिक्रमणे (Encroachment) कायम करण्यासह वनजमीन कसत असलेल्यांच्या नावे सातबारा करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भाकप व किसान सभेच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय विश्रामगृहापासून या मोर्चास प्रारंभ केला गेला. भाकप राज्य सचिव राजेंद्र देसले, साधना गायकवाड, देविदास भोपळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

शहरातील शनी चौक, बालाजी चौक, आंबेडकर चौक आदी मध्यवर्ती भागातून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी संतप्त मोर्चेकर्‍यांनी राज्य सरकारच्या (state government) धोरणाविरूध्द घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे (Tehsildar Dr. Siddharth More) यांना विविध मागण्यांचे निवेदन (memorandum) यावेळी देण्यात आले.

कसत असलेल्या वनजमीनी नावावर करण्यात याव्यात व ताब्यात असलेले पुर्ण क्षेत्र मोजून देण्यात यावे, मल्हारवाडी, गंगाधरी, आनंदवाडी आदीसह तालुक्यातील ज्या गायरान जमीनीवरील अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत त्या रद्द करण्यात येवून ते अतिक्रमण कायम करण्यात यावे. अतीवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले असल्याने आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. साकोरा शिवारातील अतिक्रमणधारक शेतकर्‍यांच्या नावावर शेतजमीनी करण्यात याव्यात.

तसेच साकोरा व पांझण शिवारातील शेतकर्‍यांना दमदाटी करणार्‍यांविरूध्द कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत भाकप राज्य सचिव कॉ. राजू देसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे वक्तव्य निषेधार्थ आहे. त्यांची केंद्र सरकारने राज्यपाल पदावरून त्वरीत हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.

या मोर्चात भास्करराव शिंदे, प्रकाश भावसार, रतन बोरसे, रघुनाथ खरे, केवळ बोरसे, पुंडलीक साळुंके, शांताराम बोरसे, माणिक हिरे, जिभाऊ वाघ, दिलीप वाघ आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com