नाशिकहुन आज धावणार किसान रेल्वे
नाशिक

नाशिकहुन आज धावणार किसान रेल्वे

ऑनलाईनच्या माध्यमातून किसान रेल्वेला हिरवा सिग्नल दाखवणार - खा. डॉ. भारती पवार

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी NASHIK

भारत हा कृषिप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी का केंद्रबिंदू मानत देशाच्या अर्थसंकल्पात शेतकरी वर्गासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.

शेतकऱ्यांसाठी अनेक योजना लवकरच टप्प्याटप्याने कार्यान्वित होणार आहे. याचाच परिपाक म्हणून शुक्रवारी (दि.७)सकाळी १०.३० वाजता ऑनलाईन उद्घाटन होणार असून शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे धावणार आहे, अशी माहिती खा.डॉ.भारती पवार यांनी दिली.

या रेल्वेमुळे शेतमालाची वाहतूक अधिक जलद होणार असून नाशवंत माल लवकरात लवकर देशाच्या मुख्य बाजारपेठेत विकता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले असून भविष्यातही शेतकरी आणि शेतकरी हिताचेच निर्णय घेण्यास कटिबद्ध आहेत.

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल हे किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सुरवात करणार आहे. मार्च मध्ये जाहीर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात किसान रेल्वे साठी भरीव निधी उपलब्ध केला होता .त्याचाच परिपाक म्हणून आज किसान रेल्वे धावणार आहे.या आधी पण केंद्र सरकारने हॉर्टिकल्चर ट्रेन, कांदा निर्यात सुलभ व जलद व्हावी म्हणून रेल्वे वॅगन वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहे.

व्हिडीओ कॉंफेरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम होणार असून दिल्लीच्या रेल्वे कार्यालयातूनच किसान रेल्वेला हिरवा सिग्नल ऑनलाईनच्या माध्यमातून दाखवणार असल्याचे खा डॉ भारती पवारांनी सांगितले .

नाशिक जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असून इथे कांदा, द्राक्ष, डाळींब, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेत असल्याने याचा मोठा फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असून त्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल ,कृषिमंत्री नरेंद्रजी तोमर यांचे शेतकऱ्यांच्यावतीने आभार .

- खासदार डॉ.भारती पवार

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com