रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते!

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते!

संतप्त महिलांनी स्वखर्चाने बुजवले खड्डे

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरात गॅस पाईपलाईनच्या (Gas Pipeline) नावाखाली मोठ्या प्रमाणात रस्ते खोदलेले आहे. परंतु हे रस्ते अद्याप मनपाने (Nashik NMC) बुजविले नाही...

त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात (Accidents) होत आहेत. अपघाताला मनपा जबाबदार असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे. परिणामी मनपा दुर्लक्ष करीत असल्याने येथील समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य व शशिकला महिला संस्था यांच्या वतीने मुरूम टाकून स्वखर्चाने खड्डा भरो हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

नाशिकरोड परिसरातील बिटको चौक (Bytco Chowk), मुक्तिधाम रोड (Muktidham Road), राजेंद्र कॉलनी (Rajendra Colony), गोसावीवाडी (Gosaviwadi) परिसर त्याचप्रमाणे इतर अनेक भागात पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवले आहेत.

परंतु हे रस्ते अद्यापही बुजविले नाही किंवा डांबरीकरण करण्यात आलेले नाही. अशाच प्रकारे परिसरातील विहितगाव, सौभाग्य नगर, लॅमरोड, महाराजा चौक, वडनेर रोड या भागात रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत.

या भागातील वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याठिकाणी अनेक वेळा किरकोळ अपघातसुद्धा होतात. मात्र अशाही परिस्थितीत मनपा दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेला जाग यावी व त्यांनी त्वरित दखल घ्यावी याकरिता समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य व शशिकला महिला संस्था यांच्या वतीने या भागात मुरूम टाकून खड्डा भरो आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी तनुजा घोलप, सोनाली गोडसे, जयश्री गोडसे, गायत्री पगार, प्रिया सिंग, सविता पोरजे, सुवर्णा साळुंखे, नंदू सानप, किरण राक्षे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com